डेंग्यूच्या रुग्णांसाठी 'ही' आहेत ५ रामबाण फळं; वेगाने वाढतात कमी झालेल्या प्लेटलेट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 02:20 PM2024-07-20T14:20:56+5:302024-07-20T14:42:19+5:30

आपल्या आजूबाजूला अशी काही फळं आहेत जी डेंग्यूच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे प्लेटलेट्स वेगाने वाढवण्यास मदत होते. त्याबाबत जाणून घेऊया...

पावसाळ्यात भारतातील अनेक शहरांत डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हा एक अतिशय गंभीर आजार आहे, ज्याला दरवर्षी हजारो लोक बळी पडतात. या आजारात प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होऊ लागते, ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो.

डेंग्यूवर कोणताही इलाज नाही, फक्त काही औषधे घेऊन आणि खाण्याच्या सवयी बदलून हा आजार बरा होऊ शकतो. आपल्या आजूबाजूला अशी काही फळं आहेत जी डेंग्यूच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे प्लेटलेट्स वेगाने वाढवण्यास मदत होते. त्याबाबत जाणून घेऊया...

प्लेटलेट्स वाढवण्यासाठी पपई हे सर्वोत्तम फळ मानलं जातं. त्यामध्ये असलेले पपई एन्झाइम डेंग्यूशी लढण्यास मदत करतात आणि प्लेटलेट्स वेगाने वाढवतात.

किवीमध्ये कॉपर, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए असते, जे हेल्दी रेड ब्लड सेल्स, इम्युनिटी वाढवण्यास आणि इलेक्ट्रोलाइट बॅलेन्स करण्यास मदत करतात.

डाळिंबात अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे डेंग्यूची लक्षणं कमी करण्यास मदत करतात. हे ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी आणि प्लेटलेट काउंट वाढवण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

मोसंबी हे व्हिटॅमिन सी आणि फायबरचा चांगला सोर्स आहे. हे फळ शरीराला हायड्रेट ठेवतं आणि प्लेटलेट्स वाढवण्यास मदत करतं.

नारळ पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्स मिळतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, डेंग्यूनंतर डिहायड्रेशनची समस्या उद्भवते आणि नारळाच्या पाण्यात पुरेसे मिनरल्स असतात, जे शरीराला हायड्रेट ठेवतात.