5 reasons why you must eat gajar ka halwa this winter
थंडीत खा गाजराचा हलवा; 'ही' आहेत पाच कारणं By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 02:39 PM2018-12-04T14:39:06+5:302018-12-04T14:59:56+5:30Join usJoin usNext 1. गाजरामुळे दृष्टी सुधारते : गाजर हलवा या पाककृतीतील मूलभूत साहित्य म्हणजे गाजर. गाजरमध्ये जीवनसत्त्व 'ए', जीवनसत्त्व 'सी', जीवनसत्त्व 'के' आणि भरपूर प्रमाणात तंतूमय पदार्थ असतात. गाजरमधील जीवनसत्त्व 'ए'हे दृष्टी सुधारण्यास फायदेशीर ठरते. 2. शरीराला मिळतात पोषकतत्त्वं : हलवा करताना दुधाचाही वापर केला जातो. दुधामध्ये कॅल्शिअम आणि प्रोटीन्स असतात. 3. काजू-मणुक्यामधून मिळतं प्रोटीन : गाजर हलव्यामध्ये वापरण्यात आलेल्या काजू आणि मणुक्यांमध्ये प्रोटीन्स आणि अॅन्टी-ऑक्सिडेन्ट्स असतात. याद्वारे शरीराला पोषकतत्त्वं मिळतात. 4. गुणकारी तूप : गाजर हलव्यामध्ये वापरण्यात येणारे साजूक तूपदेखील शरीरासाठी आरोग्यदायी ठरते. तूप हे आरोग्यासाठी पौष्टिक आहे. तुपामध्ये फॅट्स असतात. तुपाच्या सेवनामुळे हिवाळ्यात होणाऱ्या शारीरिक वेदनांचा त्रास कमी होतो. 5. रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं गाजर : हिवाळ्यात छातीतील वरील भागामध्ये संसर्ग होण्याची अधिक शक्यता असतो. हा त्रासापासून बचावण्यासाठी गाजराचे सेवन करावे. गाजरामध्ये जीवनसत्त्व ए असते, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आजारांविरोधात दोन हात करण्यासाठी आपल्याला शरीराला ऊर्जा मिळते. टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्सअन्नHealthHealth TipsFitness Tipsfood