नारळाची मलाई खाण्याचे आरोग्यदायी फायदे, जे तुम्हाला नक्कीच माहीत नसतील! By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 10:58 AM 2023-04-11T10:58:03+5:30 2023-04-11T11:25:38+5:30
coconut malai benefits : नारळाच्या मलाईमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि खनिज आढळून येतात. त्यासोबतच यात प्रोटीन, अॅंटी-ऑक्सिडेंट, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, फोलेट, कोलीन आणि पोटॅशिअमही असतं. Coconut cream Benefits : शहाळं हे आपल्या टेस्टसोबतच आपल्या आरोग्यदायी फायद्यांसाठीही ओखळलं जातं. यात मॅग्नीज, कॉपर, आयर्न, फायबर, झिंक, कार्बोहायड्रेट्ससारखे पोषक तत्व असतात. जे अनेक आजारांमध्ये फायदेशीर ठरतात. नारळाचं पाणी पिणं हेल्दी मानलं जातं. पण अनेकांना याच्या मलाईबाबत फारसं माहीत नाही. अनेक रिसर्चमधून नारळाच्या मलाईचे फायदे सांगण्यात आले आहेत.
Webmd नुसार, नारळाच्या मलाईमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि खनिज आढळून येतात. त्यासोबतच यात प्रोटीन, अॅंटी-ऑक्सिडेंट, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, फोलेट, कोलीन आणि पोटॅशिअमही असतं. जे इम्यूनिटी बूस्ट करण्यासोबतच अनेक आजार दूर करतात. चला जाणून घेऊ नारळाच्या मलाईचे आरोग्यदायी फायदे...
हेल्दी हार्टसाठी - नारळाच्या मलाईमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आढळून येतात. जे कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं काम करतात. ज्यामुळे हृदयासंबंधी गंभीर आणि जीवघेणे आजार वाढतात. नारळाच्या मलाईत रिस्क फॅक्टर कमी करण्याची क्षमता आहे.
जीवघेण्या आजारांचा धोका कमी करते - मेटाबॉलिक सिंड्रोम अशा स्थितींचा एक संग्रह आहे जो सामान्यपणे मृत्यूदराच्या उच्च धोक्याशी कनेक्टेड आहे. ज्यात हाय ब्लड प्रेशर, कंबरेचा घेर वाढणे आणि हाय कोलेस्ट्रॉल यांचा समावेश आहे. नारळाच्या उत्पादनाचं सेवन केल्याने कंबरेचा घेर कमी होतो.
मांसपेशीसाठी फायदेशीर - नारळाच्या मलाईमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम आढळतं. जे आपल्या शरीरातील प्रत्येक कोशिकांना निरोगी ठेवण्याचं काम करतं. रोज योग्य प्रमाणात पोटॅशिअमचं सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशर, मिठाबाबत संवेदनशीलता, थकवा आणि मांसपेशींमधील समस्यांचा धोका कमी होतो. अशात नारळाच्या मलाईचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोल करते - नारळाच्या मलाईचा नियमित आहारात समावेश केला तर शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. तसेच याच्या सेवनाने गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण शरीरात वाढतं. हाय कोलेस्ट्रॉल एक अशी स्थिती आहे जी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढवते.
पोटाच्या अल्सरची समस्या होते दूर - नारळाच्या मलाईने पोटातील अल्सर कमी करण्यास मदत मिळते. असं मानलं जातं की, नारळाच्या पाण्याच्या तुलनेत नारळाच्या मलाईचा जास्त प्रभाव पडतो. नारळाचं दूध आणि मलाई पोटाच्या थराला जळजळ होण्यापासून वाचवतात. जे अल्सर वाढवण्याचं काम करतात.