5 types of besan face pack for oily skin
चमकदार त्वचेसाठी बेसनाच्या मदतीने बनवा हे 5 फेसपॅक! By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 03:30 PM2018-07-10T15:30:31+5:302018-07-10T15:52:39+5:30Join usJoin usNext त्वचेच्या देखभालीसाठी घरगुती उपायदेखील महत्त्वाची भूमिका निभावतात. दैनंदिन वापरातील बेसनाच्या पीठाचे फेसपॅक चेहऱ्यावर लावून त्वचेच्या समस्यांवर नियंत्रण आणता येऊ शकते. चमकदार चेहरा हवा असल्यास दोन चमचे बेसन, लिंबू रसाचे काही थेंब आणि दुधाची साय एकत्र करुन याचा पॅक चेहऱ्यावर लावावा. 15 ते 20 मिनिटे हा पॅक चेहऱ्यावर ठेवावा व नंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुऊन घ्यावा. कोरडी त्वचेसाठी एक चमचा बेसनमध्ये मध आणि केळे मिसळून पॅक तयार करावा. हा पॅक 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर ठेवावा. या पॅकमुळे कोरड्या त्वचेची समस्या कमी होण्यास मदत होते. एक चमचा बेसनमध्ये अर्धा चमचा हळद मिसळा. हळद लावण्यानं मुरुमांमुळे चेहऱ्यावर होणारी जळजळ कमी होते. मुरुमे कमी होण्यास मदत होते. बेसनमध्ये पपईचा गर आणि काही थेंब संत्र्याचा रस मिसळून हा पॅक चेहऱ्यावर लावावा. यामुळे चेहऱ्याचा पोत सुधारण्यास आणि रंग उजळण्यास मदत होते. बेसनमध्ये रोज गुलाब पाणी मिसळून लावावे. तेलकट त्वचेला या पॅकचा फायदा होतो.टॅग्स :ब्यूटी टिप्सBeauty Tips