ब्रेड खायला आवडतो?; विकत घेताना 'ही' गोष्ट नक्की करा अन्यथा होईल आरोग्याचं मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 01:00 PM2024-07-13T13:00:40+5:302024-07-13T13:16:02+5:30

अनेकांना ब्रेड खायला आवडतो. काहींना ब्राऊन ब्रेड आवडतो तर काहींना व्हाईट ब्रेड आवडतो. पण हे कितपत आरोग्यदायी आहे हे खूप कमी लोकांना माहिती असेल

नाश्त्यात अनेकांना ब्रेड खायला आवडतो. काहींना ब्राऊन ब्रेड आवडतो तर काहींना व्हाईट ब्रेड आवडतो. पण हे कितपत आरोग्यदायी आहे हे खूप कमी लोकांना माहिती असेल. नकळत लोक लो क्वॉलिटीचा ब्रेड खाऊन आपल्या आरोग्याशी खेळतात.

ब्रेडच्या क्वालिटीबाबत जाणून घ्यायचं असल्यास ब्रेड पॅकेटवरील लेबल वाचा. पॅकेज्ड ब्रेड आणि त्याच्या ब्रँडबद्दल अनेक महत्त्वाची माहिती या लेबलवर दिलेली आहे. अशा परिस्थितीत जेव्हाही तुम्ही दुकानातून ब्रेड खरेदी कराल तेव्हा पॅकेटवरील लेबल नक्की चेक करा.

ब्रेड बनवण्याच्या प्रक्रियेत, यीस्ट एक्टिव्ह करण्यासाठी साखर आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही ब्रेड खरेदी करता तेव्हा ब्रेडमध्ये साखर मिसळली आहे का हे पाहण्यासाठी लेबल तपासा. स्वीटनर म्हणून वापर केलेल्या गोष्टी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याचं सिद्ध होतं.

साखरेप्रमाणेच ब्रेडसाठीही मीठ लागते. बऱ्याचदा ब्रँड चव वाढवण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ घालतात, ज्यामुळे ते एडिटिव्हसारखं काम करतं.

मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, ब्रेडच्या एका स्लाइसमध्ये १००-२०० मिलीग्रामपेक्षा जास्त सोडियम नसावं. अशा परिस्थितीत, एकूण मीठाचे प्रमाण तपासण्यासाठी लेबल तपासा.

ब्राऊन ब्रेड, गव्हाचा ब्रेड आणि मल्टी-ग्रेन ब्रेड हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे असा विचार करून आपण अनेकदा घेतो. पण अनेक कारखान्यांमध्ये ब्रेड बनवताना इतर प्रकारचे पीठही गव्हाच्या पिठात मिसळले जाते.

हे केले जाते जेणेकरून ब्रेड अधिक चवदार आणि आर्थिक बनू शकेल. त्यामुळे जेव्हाही तुम्ही ब्रेड खरेदी करता तेव्हा ब्रेडचे पॅकेट नक्की तपासा की ते बनवण्यासाठी कोणते पदार्थ वापरले गेले आहेत याची माहिती मिळेल.

ब्रेड खरेदी करताना सर्वप्रथम त्यावरची एक्सपायरी डेट चेक करा. त्या तारखेनंतर ब्रेड खाऊ नका. या तारखेनंतर ब्रेड खराब होण्याची प्रक्रिया सुरू होते असं म्हटलं जातं. त्यामुळे त्रास होऊ शकतो.

ब्रेड ताजा असतानाच चवीला उत्तम लागतो. बरेच ब्रँड ब्रेडची चव आणि ताजेपणा वाढवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह आणि एडिटीव्ह वापरतात. हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. अशा परिस्थितीत, शक्य तितका एडिटीव्ह असलेला ब्रेड टाळा.

फायबर हे ब्रेडच्या सर्वात लोकप्रिय घटकांपैकी एक आहे. प्रोसेसिंग करताना फायबर निघून जातं. जे आरोग्यासाठी चांगलं नसतं, म्हणून, लेबलवर नमूद केलेल्या फायबरचं प्रमाण नक्की चेक करा.