पिस्त्याच्या या ६ उपयोगांमुळे ते शरीरासाठी उपयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 06:25 PM2017-12-18T18:25:14+5:302017-12-18T19:02:11+5:30

सुका मेव्यामधला पिस्ता हा एक घटक आपण तितका गांभीर्याने घेत नाही. त्यात भरपूर प्रमाणात असलेल्या प्रोटीन्स, फायबर्स आणि अँटिऑक्सिडंटमुळे तो नैसर्गिकरीत्या कोलेस्ट्रॉल फ्री असतो. दैंनदिन आहारात रोज मुठभर पिस्तातरी खाल्ले जाणंं आवश्यक आहे.

पिस्तामुळे नैसर्गिकत: फ्री रॅडिकल्स डॅमेज होण्यास आळा बसतो. त्यातील इतर गुणधर्मांमुळे डोळ्यांचे विविध आजार दूर राहतात. त्यामुळे पिस्ता आपल्या शरीरात जाणं महत्त्वाचं असते.

पिस्त्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन बी ६ मुळे फक्त हिमोग्लोबिनची निर्मिती होण्यास मदत होते आणि त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती देखील वाढते. व्हिटॅमिन बी६ च्या विपुलतेमुळे कोणत्याही संसर्गाशी लढण्याची शरीराची क्षमता वाढते. म्हणून दररोज पिस्ता खाणे फायद्याचे ठरेल

पिस्तामध्ये कॉलेस्ट्रॉल नसल्याने शरीरातील कॅलरीज वाढत नाहीत. तसंच छोटी भूक भागवण्यासाठी पिस्ता हा उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय आहे. इतर काही फास्ट फुड खाण्याऐवजी पिस्ता खाल्याने शरीराची स्थूलता कमी होण्यास मदत होते.

पिस्ता खाणे आपल्या त्वचेसाठी फार फायदेशीर ठरतं. कारण त्यात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. वयवाढीची लक्षणं, यूव्ही किरणं यापासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी पिस्त्यामधील काही घटकांची मदत होते. तसंच त्वचेच्या कॅन्सरलादेखील दूर ठेवता येतं. पिस्ताचे तेल कोरड्या त्वचेला आर्द्रता पुरवते