7 symptoms of high blood pressure myb
कोरोना विषाणूंमुळेच नाही तर 'या' समस्येमुळे होतो श्वास घ्यायला त्रास, वेळीच जाणून घ्या लक्षणं By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 11:12 AM2020-05-18T11:12:10+5:302020-05-18T11:25:54+5:30Join usJoin usNext रक्तदाब वाढल्यानंतर शरीराला गंभीर समस्यांचा सामना करावा लागु शकतो. कारण सध्याच्या जीवनशैलीतील बदलांमुळे फक्त वयस्कर लोकांनाच नाही तर सगळ्याच वयोगटातील लोकांना या समस्या जाणवतात. रात्री उशीरापर्यंत जागणं, अनियमित खाण्यापिण्याच्या वेळा, मादक पदार्थाचे अतिसेवन शरीरासाठी अनुकूल ठरत नाही. त्यामुळे नकळतपणे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवून गंभीर आजार होतात. यात हृदयाच्या विकारांचा समावेश असतो. हार्ट अटॅक, हार्ट फेल्योर, कार्डियाक अरेस्टसारख्या समस्या उद्भवतात. या व्यतिरिक्त ब्रेन स्ट्रोक किडनी फेल्योरची समस्या उद्भवू शकते. आज आम्ही तुम्हाला ब्लड प्रेशरची काही खास लक्षणं सांगणार आहोत. ही लक्षणं दिसत असतील तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. अन्यथा कमी वयातच गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. मान, पाठदुखणं : उच्च रक्तदाबाच्या प्राथमिक लक्षणांमध्ये व्यक्तीच्या डोक्याच्या मागच्या बाजूला आणि मानेत, पाठीत वेदना होतात. अनेकदा या समस्यांकडे दुर्लक्ष करणं घातक ठरू शकतं. ताण-तणाव : जर तुम्हाला जास्त ताणाखाली असल्यासारखं वाटत असेल तर उच्च रक्तदाबाचा संकेत असू शकतो. त्यामुळे लोकांना लहान लहान गोष्टींत राग यायला सुरूवात होते. अनेकदा चूक बरोबर यांतील फरक कळत नाही. चिडचिडपणा येतो. त्यासाठी नेहमी तपासणी करणं गरजेचं आहे. चक्कर येणं : उच्च रक्तदाबाच्या लक्षणांमध्ये डोकं दुखणं हे लक्षणं प्रामुख्याने जाणवत असून चक्कर येण्याची समस्या उद्भवते. थकवा येणं : जर तुम्हाला काम करताना थकवा जाणवत असेल किंवा शिडी चढत असताना तुम्हाला दम लागत असेल तर तुम्ही उच्चरक्तदाबाच्या त्रासानेग्रस्त आहात त्यामुळे त्वरित तपासणी करून घ्या. नाकातून रक्त बाहेर येणं : श्वास घ्यायला त्रास होणं ही समस्या सध्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये सुद्धा आढळून येते. हे लक्षण उच्च रक्तदाबाचं सुद्धा असू शकतं. त्यामुळे दम लागण्याची समस्या उद्भवते. झोप न येणं : उच्च रक्तदाबाच्या रुग्णांला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यापैकीच एक म्हणजे झोप न येण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे अस्वस्थ वाटतं हृदयाचे ठोके वाढणे : जर हृदयाचे ठोके वाढत असतील तर हे लक्षणं रक्तदाब वाढण्याचं असू शकतं. यात नेहमीपेक्षा जास्त वेगाने छातीत धडधडण्याची समस्या उद्भवते. अनेकदा श्वास घ्यायला त्रास तीव्र त्रास होतोटॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यHealth TipsHealth