8 Benefits of drinking water from copper vessels
तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे 8 फायदे By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 04:41 PM2018-02-05T16:41:56+5:302018-02-05T17:11:39+5:30Join usJoin usNext रक्त वाढते : दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास शरीरतील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते व अॅनिमिया रोगाचा धोकादेखील टळतो. अॅनिमिया रोगामध्ये शरीरातील लाल रंगांच्या पेशी कमी होतात. सांधेदुखी दूर होते : रोज सकाळी-संध्याकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे, यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो व शरीरास आराम मिळतो. हृदयविकारापासून होतो बचाव : तांब्याच्या भांड्यात 8 ते 10 तास ठेवलेले पाणी प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि हृदयाचे कार्य सुरळीत सुरू राहते. जखमा लवकर भरुन निघतात : तांब्यामध्ये असलेल्या अॅन्टी-बॅक्टेरिअलमुळे जखमा लवकर भरुन निघण्यास मदत होते. थायरॉइड : लवकर वजन वाढणे किंवा कमी होणे, थकवा जाणवणे ही थायरॉइडची प्रमुख लक्षणे आहेत. तांब्यामधील कॉपर थायरॉक्सिन हार्मोन्सला संतुलित ठेवण्याचे कार्य करते. यामुळे थायरॉइडचाही धोका दूर होतो. कर्करोग धोका कमी होतो : तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स पर्याप्त प्रमाणात असतात, यामुळे कर्करोगाविरोधात लढण्याची क्षमता वाढते. पचन क्रिया सुधीरते : पित्त, गॅस किंवा पोटाचे कोणतेही विकार झाल्यास तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात कमीत कमी 8 तास ठेवलेले पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. यामुळे पचनक्रिया सुधारते.टॅग्स :आरोग्यकर्करोगHealthcancer