पावसाळ्यातील आजारांवर रामबाण उपाय ठरतात 'हे' ८ सुपरफूड्सचं, रहाल निरोगी आणि फीट! By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 09:18 AM 2024-07-06T09:18:45+5:30 2024-07-06T09:41:35+5:30
Immunity Booster Food In Monsoon : पाऊस आला की, आपल्यासोबत काही आजारही घेऊन येतो. या दिवसात वातावरण बदलामुळे पचनक्रिया कमजोर होते आणि रोगप्रतिकारक शक्तीही कमजोर होते. Immunity Booster Food In Monsoon : सामान्यपणे लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही पावसाची ओढ लागलेली असते. कधी एकदाचा पाऊस येतो आणि गरमी जाऊन थंड थंड पावसाच्या सरी अंगावर घेता येतील असं सगळ्यांना वाटत असतं. पाऊस सगळ्यांनाच आवडतो आणि महत्वाचाही आहेच. पण पावसाचे काही नुकसानही आहेत. पाऊस आला की, आपल्यासोबत काही आजारही घेऊन येतो. या दिवसात वातावरण बदलामुळे पचनक्रिया कमजोर होते आणि रोगप्रतिकारक शक्तीही कमजोर होते. त्यामुळे वेगवेगळ्या गंभीर आजारांची लागण होते. हे आजार होऊ नये म्हणून काही गोष्टींचा आहारात आवर्जून समावेश केला पाहिजे. जेणेकरून रोगप्रतिकारक शक्ती वाढले आणि पचनक्रियाही चांगली राहील.
आल्याचा वापर आल्याचा वापर आपल्या घरांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. आलं मसाल्यासोबतच एक औषधी आहे. आयुर्वेदातही आल्याला फार महत्व आहे. आल्यामध्ये भरपूर अॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स तत्व असतात. हे तत्व पावसाळ्या शरीराचा वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून बचाव करतात. आल्याच्या चहाचं तुम्ही सेवन करू शकता किंवा वेगवेगळ्या पदार्थांद्वारे सेवन करू शकता.
हळद हळद ही एक रामबाण औषधी मानली जाते. हळदीचा वापर वेगवेगळ्या उपचारांसाठी केला जातो. यात करक्यूमिन नावाचं तत्व असतं. ज्यामुळे यात अॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट तत्व असतात. याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीराचा वेगवेगळ्या इन्फेक्शन आणि आजारांपासून बचाव होतो. तुम्ही या दिवसात हळदीचं दूध घेऊ शकता किंवा वेगवेगळ्या भाज्यांमधून याचं सेवन करू शकता.
आयुर्वेदिक चहा एक्सपर्ट सांगतात की, या दिवसांमध्ये आजारांपासून बचाव करण्यासाठी खास चहाचं सेवन करू शकता. तुम्ही तुमच्या चहामध्ये आलं आणि तुळशीची पाने टाकू शकता याने तुमची पचनक्रिया चांगली होईल व इम्यूनिटीही बूस्ट होईल. तसेच चहामध्ये लेमन ग्रास टाकल्याने तुम्हाला ब्लोटिंगची समस्या होणार नाही.
सूरन आणि अंबाडीची भाजी काही एक्सपर्ट सांगतात की, पावसाळ्यात भाज्यांवर कीटक किंवा अळ्या असतात. त्यामुळे सूरन आणि अंबाडीच्या भाजीचा आहारात समावेश करावा. या दोन्हींमध्ये अनेक पोषक तत्व आणि व्हिटॅमिन्स असतात. जे या दिवसात तुमचं आरोग्य चांगलं ठेवतात.
लसूण लसणामध्ये एलिसिन नावाचं एक शक्तीशाली तत्व असतं. ज्यात अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-व्हायरल गुण असतात. हे तत्व शरीरात पांढऱ्या रक्तपेशी वाढवून इम्यूनिटी बूस्ट करतात. ज्यामुळे शरीराचा अनेक इन्फेक्शन आणि आजारांपासून बचाव होतो.
बदाम बदामामध्ये व्हिटॅमिन ई असतात. तसेच यातील अॅंटी-ऑक्सिडेंट इम्यून सिस्टीम मजबूत ठेवण्यास मदत करतात. तुम्ही बदाम भिजवून, कच्चे किंवा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकून खाऊ शकता. यांनी शरीराला इतरही अनेक पोषक तत्व मिळतात.
आंबट फळं संत्री, लिंबू आणि द्राक्ष अशी व्हिटॅमिन सी भरपूर असणारी फळं या दिवसात खायला हवीत. याने इम्यूनिटी मजबूत होते. तसेच या फळांमुळे शरीरात पांढऱ्या रक्त पेशीही वाढतात. अशात यांनी तुमचा वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून बचाव होतो.
हेल्दी ठेवणाऱ्या गोष्टी पावसाळ्यात आठवड्यातून दोन ते तीन वेळा उकडलेले शेंगदाणे खायला हवेत. यातून शरीराला भरपूर पोषण मिळतं. तसेच पावसाळ्यात मिळणारा मक्याचं कणीस खायला हवं. दुधी भोपळा, काकडी यांचंही सेवन करावं.