दिवसभर एनर्जी टिकवण्यासाठी 9 जपानी सवयी, होतील अनेक फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 10:12 AM2024-01-03T10:12:52+5:302024-01-03T10:25:07+5:30

आज आम्ही तुम्हाला जपानमधील लोकांच्या 9 दैनंदिन सवयी सांगणार आहोत. ज्या फॉलो करून तुम्हीही निरोगी आणि फीट राहू शकता.

नेहमीच अशी चर्चा केली जाते की, जपानमधील लोक खूप जास्त आयुष्य जगतात. सोबतच जगात सगळ्यात निरोगी लोकही जपानमध्येच असतात. येथील लोकांची लाइफस्टाईलही सगळ्यात बेस्ट मानली जाते. पण अनेकांना हे माहीत नाही की, जपानमधील लोक इतके फीट आणि निरोगी कसे राहतात. अशात आज आम्ही तुम्हाला जपानमधील लोकांच्या 9 दैनंदिन सवयी सांगणार आहोत. ज्या फॉलो करून तुम्हीही निरोगी आणि फीट राहू शकता. सोबतच यामुळे तुम्हाला दिवसभर एनर्जीही मिळू शकते.

फिजिकल अॅक्टिविटी - रोज काहीना काही फिजिकल अॅक्टिविटी करणं जसे की, पायी चालणे, मार्शल आर्ट हा जपानमधील लोकांच्या रोजच्या सवयीचा भाग आहे. यामुळे त्यांना शरीर स्वस्थ ठेवण्यास आणि निरोगी राहण्यास मदत मिळते.

ग्रीन टी - ग्रीन टी चे आरोग्याला अनेक फायदे होतात. डायबिटीस, हृदयरोग अशा गंभीर आजारांचा धोकाही यामुळे कमी होतो. सोबतच ग्रीन टी मुळे वजन कमी करण्यासही मदत मिळते. वजन नियंत्रणात राहतं.

चांगली झोप - जपानी लोक चांगली आणि पुरेशी झोप घेण्याला फार महत्व देतात. ज्यामुळे त्यांच्या दिवसाची सुरूवात चांगली होते आणि दिवसभर ते फ्रेश राहतात.

हायड्रेट राहणं - शरीर हायड्रेट ठेवणं हा जपानी आरोग्य नियमांमधील महत्वाचा नियम आहे. त्यामुळे येथील लोक दिवसभर जास्तीत जास्त पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवतात. ज्यामुळे ते दिवसभर फ्रेश राहतात आणि त्यांना एनर्जी मिळते.

फॉरेस्ट बाथिंग - जंगलात फिरायला जाणं, तिथे वेळ घालवणं हे जपानी लाइफस्टाईलमध्ये खूप महत्वाचं मानलं जातं. जंगलातील नदीमध्ये आंघोळ करण्याला जपानी लोक प्राधान्य देतात. याने त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं.

बॅलन्स लाइफ - जपानी लोक बॅलन्स लाइफ जगण्याला महत्व देतात. ते कामालाही महत्व देतात. मात्र सोबतच फॅमिलीसोबतही वेळ घालवतात आणि आपल्या आवडीही जपतात.

मेडिटेशन - जपानी लाइफस्टाईलमध्ये मेडिटेशनला फार महत्व आहे. यामुळे त्यांना मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते.

कमी गोष्टींमध्ये जगणं - ज्या गोष्टी आहेत त्यांच्यात समाधान मानून जगणं हा जपानी लाइफस्टाईलचा महत्वाचा भाग आहे. यामुळे त्यांना महत्वाच्या गोष्टींवर फोकस करण्यास मदत मिळते. तसेच सगळ्या गोष्टींचं नियोजन करणं ही त्यांची सवय असते.