ac harmful side effects spending so much time in ac may cause disease sleep eye back pain
ACमध्ये जास्त वेळ बसता का? वेळीच काळजी घ्या, 'हे' आजार होऊ शकतात! By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2023 03:08 PM2023-05-31T15:08:23+5:302023-05-31T15:20:59+5:30Join usJoin usNext तुम्हीही ऑफिसमध्ये ८-९ तास AC मध्ये बसता का? मग तर हे वाचाच Air conditioner side effects: ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी ९ तास सतत AC मध्ये बसतात. तसेच उन्हाळ्यात अनेकांना पंख्याची हवा पुरेशी वाटत नाही, त्यामुळे लोक घरातही AC लावून बसतात. पण AC च्या वापरामुळे दुष्परिणाम होऊ शकतात, जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असू शकतात. AC मध्ये जास्त वेळ बसल्याने किंवा एअर कंडिशनर वापरल्याने आपली त्वचा कोरडी होऊ शकते. यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी होता. ही बाब हळूहळू त्वचेसाठी खूप हानिकारक ठरू शकते. एअर कंडिशनरच्या अतिवापरामुळे डोळ्यांना कोरडेपणा येऊ शकतो. यामुळे आरोग्याची हानी होऊ शकते आणि डोळ्यांच्या दृष्टीवर व कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. AC मध्ये खूप काळ बसल्याने किंवा एअर कंडिशनरच्या अति वापराने तुमच्या श्वसनाच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे बरगड्यांचे आजार उद्भवण्याची शक्यताही वाढू शकते. एअर कंडिशनरमध्ये बराच वेळ बसून राहिल्याने डोकेदुखीचा त्रास सुरू होतो. तसेच, AC च्या अतिवापराने चक्कर येण्याची शक्यताही वाढू शकते. त्यामुळे वेळीच ही सवय कमी करा ACच्या अतिवापराने झोपेशी संबंधी आजार होण्याची शक्यता असते. AC च्या अतिसवयीने झोप न लागणे किंवा जास्त झोप येणे अशी अनियमितता शक्य आहे. AC च्या जास्त वापरामुळे तुमच्या शरीराला थंडावा मिळतो, पण एअर कंडिशनरमुळे मिळत असलेल्या वाऱ्याने व थंडाव्यामुळे तुम्हाला दीर्घकाळासाठी पाठदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे.टॅग्स :हेल्थ टिप्सपाठीचे दुखणे उपायHealth TipsBack pain