या 5 मसाल्यांमध्ये आहे औषधांची शक्ती, किडनी स्टोन-लघवीत जळजळ काही मिनिटात होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 04:53 PM2022-11-05T16:53:33+5:302022-11-05T17:10:05+5:30

किडनीमध्ये जराही समस्या झाली तर याने सगळं शरीर प्रभावित होऊ शकतं. किडनीची समस्या सायलेंट किलरसारखं काम करते.

Top 5 Kidney-Friendly Spices: किडनी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचं काम करते. किडनी हा शरीरात इतर महत्वाच्या अवयवांइतकाच महत्वाचा अवयव आहे. याद्वारे रक्तातील विषारी पदार्थ लघवीद्वारे शरीराबाहेर काढले जातात. यासोबत रक्तदाब नियंत्रित ठेवणे, लाल रक्तपेशी अॅक्टिव करणे आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी मदत करते.

किडनीमध्ये जराही समस्या झाली तर याने सगळं शरीर प्रभावित होऊ शकतं. किडनीची समस्या सायलेंट किलरसारखं काम करते. किडनीच्या आजारांचा धोका कमी करण्यासाठी अनेक उपाय आहेत. ज्यातील काही फारच सोपे आहेत. याचा दावा अनेक रिसर्चमधून करण्यात आला आहे.

आवळा - रिसर्चगेटच्या एका स्टडीनुसार, आवळ्यामध्ये फेनोलिक तत्व आणि अॅंटीऑक्सिडेंट आढळतात. जे किडनीला अनेक समस्यांपासून वाचवतात आणि याची काळजीही घेतात. तसेच आवळ्यातील फाइब्रोसिस, ऑक्सीडेटिव तणाव आणि किडनीवरील सूज कमी करण्यासही मदत करतात.

आलं - एनसीबीआई मध्ये प्रकाशित स्टडीनुसार, आल्यामध्ये अनेक औषधी गुण असतात जे किडनीसोबत लिव्हरमधीलही टॉक्सिन बाहेर काढण्यासाठीचं काम करतात.

हळद - हळदीमध्ये हार्ट, लिव्हर आणि किडनीला रोगमुक्त करणाऱ्या गुणाच्या मुख्य रूपात पाहिलं जातं. अशात याचं सेवन केल्याने किडनीला होणारं इन्फेक्शन आणि यूरिनरी संबंधी समस्या कमी करण्यास मदत करतं.

त्रिफळा - हे तीन औषधी गुण असलेल्या फळांना समान प्रमाणात मिक्स करून तयार केलं जातं. जे अनेक आजारांवर उपचार म्हणून वापरलं जातं. एक्सपर्ट सांगतात की, याच्या सेवनाने किडनी आणि लिव्हर हेल्दी राहतं. सोबतच किडनीच्या कार्याला मदत करतं.

धणे- धण्याची पाने आणि बियांमध्ये असलेले मूत्रवर्धक गुण किडनीला निरोगी ठेवण्यास मदत करतात. धण्याचं पाणी रिकामी पोटी प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.