add super food in your diet these monsoon season to prevent dengue chikungunya and malaria
डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनियावर परिणामकारक ठरतात 'हे' पदार्थ By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 12:46 PM2019-07-29T12:46:49+5:302019-07-29T12:54:49+5:30Join usJoin usNext डेंगू, मलेरिया, चिकन गुनिया यासारख्या आजारांची सध्या साथ पसरली आहे. हवामानात बदल होत असल्याने आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. कोणते पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असतात हे जाणून घ्या. संत्र संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, अॅन्टीऑक्सीडेंट, फायबरचे प्रमाण हे अधिक असते. त्यामुळे संत्र आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पपई पपई त्वचेसाठी अत्यंत लाभदायक असते. पपईचं दररोज सेवन केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या, फाइन लाइन्स, पिंपल्स यांसारख्या समस्या दूर होतात. तसेच प्लेटलेट वाढवण्यासाठी पपई खाणं आवश्यक आहे.खिचडी खिचडीमध्ये फायबर आणि पोषक तत्त्व असल्याने आजारापासून लढण्याची ताकद मिळते. यामुळे पचन शक्ती चांगली राहते. आलं आलं खाल्ल्यास इम्युनिटी सिस्टम मजबूत होते. आल्यामध्ये अॅन्टी-इंफ्लेमेटरी आणि अॅन्टी बॅक्टीरियल गुण असतात त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.हर्बल टी ग्रीन टी किंवा हर्बल टी घेणं आरोग्यासाठी हितकारक आहे.नारळ पाणी नारळ पाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. रोग प्रतिकारक शक्ती वाढते तसेच आजारांना लांब ठेवण्यास मदत होते. थायरॉइड हार्मोन्सला संतुलित ठेवण्याचे काम नारळ पाणी करते.व्हेजिटेबल ज्यूस गाजर, काकडी आणि अन्य भाज्यांचा रस हा शरिरासाठी फायदेशीर असतो. भाज्यांमध्ये व्हिटॅमिनचे प्रमाण अधिक असल्याने त्याचं सेवन करणं महत्त्वाचं आहे. टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. टॅग्स :डेंग्यूहेल्थ टिप्सपौष्टिक आहारएससीजेdengueHealth TipsHealthy Diet Planscj