छोटं-हलकं काम करूनही थकवा जाणवतो? नॅचरली स्टॅमिना वाढवण्यासाठी खा 'हे' ७ फूड्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 10:39 AM2024-08-03T10:39:00+5:302024-08-03T11:24:16+5:30

Stamina Boosting Foods : तुम्हालाही नेहमीच थकवा किंवा कमजोरी जाणवत असेल तर तुम्हाला तुमची काम करण्यासाठी क्षमता वाढवण्यासाठी तुमचा स्टॅमिना वाढवण्याची गरज आहे.

Stamina Boosting Foods : बऱ्याच लोकांना काही छोटी छोटी कामे करूनही थकवा जाणवतो. त्यांना सतत कमजोरी सुद्धा जाणवते. तुम्हालाही असा अनुभव येत असेल तर तुमच्यात स्टॅमिनाची कमी आहे. शरीर नेहमी ऊर्जावान ठेवण्यासाठी स्टॅमिनाची फार महत्वाची भूमिका असते. ही आपल्या शरीरातील अशी शक्ती असते जी आपल्याला दिवसभर वेगवेगळी कामे करण्यासाठी क्षमता देत राहते. ज्याला एनर्जी म्हणतात.

तुम्हालाही नेहमीच थकवा किंवा कमजोरी जाणवत असेल तर तुम्हाला तुमची काम करण्यासाठी क्षमता वाढवण्यासाठी तुमचा स्टॅमिना वाढवण्याची गरज आहे आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी काही हेल्दी फूड्स खाण्याची गरज आहे. अशाच काही फूड्सबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दलियामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोषक तत्व आणि फायबर भरपूर असतात. ज्याद्वारे तुम्ही आवश्यक ती एनर्जी मिळवू शकता. अशात तुम्ही दिवसभर एनर्जी मिळवण्यासाठी किंवा कायम ठेवण्यासाठी तुमच्या दिवसाची सुरूवात दलिया खाऊन करू शकता. दलियाचं सेवन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता.

व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम आणि फायबर असलेली आंबट फळं जसे आवळा, संत्री आणि लिंबू सुद्धा नॅचरली स्टॅमिना वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

केळीमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स, फायबर आणि पोटॅशिअम असतात. जे एनर्जी बूस्ट करण्याचं काम करतात. अशात तुम्ही केळींचा आपल्या डाएटमध्ये समावेश करावा.

बिटामध्ये असलेल्या नायट्रेटने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी मदत मिळते. तसेच याने स्टॅमिना सुद्धा वाढतो. अशात यांचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करावा.

आयर्न, मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन भरपूर असलेल्या पालकाने रेड ब्लड सेल्स वाढवण्यास मदत मिळते आणि ब्लड सर्कुलेशनमध्ये सुधारणा होते. याने शरीराची एनर्जी वाढते आणि सोबतच स्टॅमिनाही वाढतो.

प्रोटीन आणि फायबर भरपूर असलेल्या बदामात हेल्दी फॅटही भरपूर असतं. ज्याने तुम्हाला दिवसभरातील कामे करण्यासाठी एनर्जी मिळते. अशात बदाम स्टॅमिना वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

अॅंटी-ऑक्सीडेंट, प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम आणि हेल्दी फॅट भरपूर असलेल्या चिया सीड्सने शरीरात भरपूर एनर्जी मिळते.