Bad Cholesterol : शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी कोणती फळं खावीत? By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 01:27 PM 2022-11-07T13:27:20+5:30 2022-11-07T13:36:02+5:30
Fruits For High Cholesterol: आपल्या शरीरात हेल्दी सेल्स बनवण्यासाठी कोलेस्ट्रॉलची गरज असते, पण शरीरात याचं प्रमाण जास्त झालं हृदयासंबंधी वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. Fruits For High Cholesterol: कोलेस्ट्रॉल हा एक मेणासारखा पदार्थ असतो जो लिव्हरमध्ये तयार होतो आणि शरीरात सगळीकडे पसरतो. आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळतात एक म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल आणि दुसरा म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल. बॅड कोलेस्ट्रॉल आपल्या आर्टरीजमध्ये जमा होतं. ज्याने अनेक प्रकारचे आजार होऊ लागतात. आपल्या शरीरात हेल्दी सेल्स बनवण्यासाठी कोलेस्ट्रॉलची गरज असते, पण शरीरात याचं प्रमाण जास्त झालं हृदयासंबंधी वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो.
शरीरात कोलेस्ट्रॉलची लेव्हल फॅटी फूड खाल्ल्याने, एक्सरसाइज न केल्याने, वजन वाढल्याने, स्मोकिंगने आणि मद्यसेवन केल्याने वाढते. अनेकदा हे जेनेटिकही असतं. शरीरात कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढण्याचे कोणतेही संकेत दिसत नाही. पण यामुळे अनेक आजार होऊ शकतात. आर्टरीजमध्ये कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढल्याने शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी क्रॅम्पची समस्या होऊ लागते.
एवोकाडो - एवोकाडो कोलेस्ट्रॉल लेव्हल मॅनेज करण्यासाठी एक चांगलं फळ आहे. याने तुमचं हार्ट हेल्दी ठेवण्यासाठी मदत मिळते. तसेच याने स्ट्रोकचा धोकाही कमी राहतो. शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हे फळं फार फायदेशीर ठरतं.
सफरचंद- हे एक ऑलटाइम फेव्हरट फळ आहे. ज्याने त्वचेसोबतच हार्टही हेल्दी राहतं. सफरचंद खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत मिळते. तसेच अनेक आजारांपासूनही या फळाने बचाव होतो.
आंबट फळं - व्हिटॅमिन सी साठी तुम्ही द्राक्ष, संत्र आणि लिंबाचा डाएटमध्ये समावेश करू शकता. याने त्वचा आणि केसांना तर फायदा होतोच, सोबतच कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासही मदत मिळते.
टोमॅटो - टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि के सारखे पोषक तत्व आढळतात. हे तुमच्या हार्टसाठी फायदेशीर राहतात. याने कोलेस्ट्रॉलसोबत तुमचं ब्लड प्रेशरही लेव्हलमध्ये राहतं.
पपई - पपईमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येतं. याने खराब कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत मिळते. त्यासोबत ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं.