ब्लॅक फंगसचा मृत्यूदर कोरोनापेक्षा अधिक, स्पर्श केल्याने पसरतो का? डॉ. गुलेरिया यांनी दिली महत्वाची माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 08:42 AM 2021-05-24T08:42:44+5:30 2021-05-24T08:47:33+5:30
ब्लॅक फंगसच्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळाला नाही आणि त्याला शरीरात अधिक पसरायला वेळ मिळाला, तर कोरोना व्हायरस संक्रमणाच्या तुलनेत याचा मृत्यूदर अधिक आहे. (black fungus treatment and death rate) ब्लॅक फंगसवर वेळीच उपचार केला गेला नाही आणि तो शरीरात अधिक पसरला, तर त्याचा मृत्यूदर कोरोना व्हायरस संक्रमणाच्या मृत्यूदरापेक्षाही अधिक आहे, असे दिल्ली येथील AIIMSचे संचालक डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे. ते एका वृत्त वाहीनीवरील कार्यक्रमात कोरोना रुग्णांना होत असलेल्या ब्लॅक फंगससंदर्भात बोलत होते. (AIIMS DR randeep guleria on black fungus treatment death rate coronavirus)
ब्लॅक फंगस आपल्या शरीरात कशा प्रकारे डिटेक्ट करावा? इंडिया टीव्हीवरील 'जीतेगा इंडिया, हारेगा कोरोना', या कार्यक्रममात बोलताना डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, ज्या लोकांना शूगचा त्रास आहे, अशांनी सातत्याने आपील शुगर कंट्रोल करायला हवी. जर आपण कोरोना पॉझिटिव्ह असाल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच स्टेरॉइड घ्यायला हवे. डोकेदुखी, जी बरी होत नाही, नाकातून रक्त येणे, चेहऱ्याच्या कुठल्याही भागाला सूज येणे, अस्पष्ट दिसणे. कधी-कधी ताप येणे अथवा खोकल्यासोबत रक्त येणे हीदेखील ब्लॅक फंगसची लक्षणं आहेत.
ब्लॅक फंगसपासून किती सावध रहावे? AIIMS डायरेक्टर रणदीप गुलेरिया म्हणाले, ब्लॅक फंगसच्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळाला नाही आणि त्याला शरीरात अधिक पसरायला वेळ मिळाला, तर कोरोना व्हायरस संक्रमणाच्या तुलनेत याचा मृत्यूदर अधिक आहे. दुसऱ्या कोरोना लाटेत भीती पोटी लोकांनी अधिक स्टेरॉइड घेतले आहे. यामुळेच देशात ब्लॅकफंगसचे रुग्ण वाढले आहेत.
गुलेरिया म्हणाले, "ब्लॅक फंगसची प्रकरणं वाढली आहेत. मात्र, मला असे वाटते, की जस-जशी कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल, तस-तशी ब्लॅक फंगसची प्रकरणंही कमी होतील.
ब्लॅक फंगसचे रुग्ण यापूर्वीही मिळाले आहेत? "ब्लॅक फंगस आधीही होता आपण आकडे पाहीले, तर पहिल्या लाटेतही काही रुग्ण आढळले होते. मात्र, रुग्ण संख्या अत्यंत कमी होती. याशिवाय, 2002-2003मध्ये आलेल्या सार्सचा विचार करता, तेव्हाही ब्लॅक फंगसचे रुग्ण आढळले होते," असे गुलेरिया म्हणाले.
कमी इम्यूनिटीत स्टेरॉइडचा धोका? डॉ. गुलेरिया म्हणाले, कोरोना व्हायरसमुळे शरिरातील इम्यूनिटी कमी होते, यामुळे फंगस इन्फेक्शनची प्रकरणं वाढतात. याशिवाय, कुणी स्टेरॉइड अधिक प्रमाणावर घेतले आणि ती व्यक्ती डायबेटिक आहे, तर त्या व्यक्तीला फंगसचा धोका अधिक असतो. अशात, ज्या लोकांना कोरोनाची कमी लक्षणे आहेत अथवा ज्यांना लक्षणं नाहीत, अशा रुग्णांनांना सल्ला आहे, की त्यांनी स्टेरॉइड घेऊ नये."
काय आहे ब्लॅक फंगसची ट्रीटमेंट? गुलेरिया यांनी सांगितले, की वेळ असताच ब्लॅक फंगसची माहिती मिळाल्यास हल्की सर्जरी करून फंगस काढला जाऊ शकतो. मात्र, ते कळायला उशीर झाला आणि तो शरीरात अधिक आत गेला, तर मोठी सर्जरी आवश्यक होते.
स्पर्श केल्याने ब्लॅक फंगस पसरतो? डॉ. गुलेरिया म्हणाले, ब्लॅक फंगस स्पर्श केल्याने होणारा आजार नाही. तो एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत पसरत नाही. मात्र, कोरोनाच्या तुलनेत, हा आजार बरा व्हायरला अधिक वेळ लागतो.