शरीरात जाताच कमाल करतं अ‍ॅलोव्हेरा जेल, फायदे वाचाल तर लगेच सेवन सुरू कराल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 12:45 PM2023-03-31T12:45:09+5:302023-03-31T12:53:25+5:30

Aloe Vera Gel Benefits: जर तुम्हाला हाडांना आजारापासून वाचवायचं असेल तर अ‍ॅलोव्हेरा जेलची मदत घेऊ शकता.

ऑस्टियोपोरोसिसमध्ये हाडांची मजबूती नष्ट होऊ लागते. यामुळे हाडांमध्ये छोटी छोटी छिद्र तयार होतात. हा आजार पुढे जाऊन इतका खतरनाक होतो की, छोटीशा जखमेमुळे मोठा फ्रॅक्चर होऊ शकतो. जर तुम्हाला हाडांना या आजारापासून वाचवायचं असेल तर अ‍ॅलोव्हेरा जेलची मदत घेऊ शकता.

अ‍ॅलोव्हेरा जेलचं सेवन कसं करावं? - सामान्यपणे अ‍ॅलोव्हेरा जेल त्वचेवर लावलं जातं. पण तुम्ही याचं सेवनही करू शकता आणि याचं ज्यूस बनवूनही पिऊ शकता. यासाठी अ‍ॅलोव्हेराच्या पानांमधून जेल काढून त्यातून पिवळं लॅटेक्स निघून जाऊ द्या. नंतर जेल थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवल्यावर खावे.

मजबूत होतील हाडं - अ‍ॅलोव्हेरा जेलमध्ये acemannan असतं. 2014 मध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, हे तत्व हाडांना मजबूत करण्यासाठी महत्वाचं मानलं जातं. या तत्वामुळे हाडांचं घनत्व वाढतं आणि हाडांसंबंधी जखमाही ठीक होऊ लागतात.

वाढतं इन्सुलिन - डायबिटीसच्या रूग्णांसाठी अ‍ॅलोव्हेरा जेल लाभदायक ठरू शकतं. याने ब्लड शुगर लेव्हल कमी करू शकता. 2011 च्या एका रिसर्चनुसार, अ‍ॅलोव्हेरा जेल लठ्ठपणा वाढणाऱ्या इंफ्लामेशनला रोखतं. यामुळे शरीरात इन्सुलिनचं काम वाढतं.

माउथवॉशसारखा करा वापर - अ‍ॅलोव्हेरा जेलचा तुम्ही माउथवॉशसारखा वापर करू शकता. यात महत्वाचे अ‍ॅंटी-बॅक्टेरियल, अ‍ॅंटी-फंगल, अ‍ॅंटी-वायरल गुण असतात. ज्याने दातांची किड दूर होते. याने तोंडाचं आरोग्य चांगलं होऊ शकतं.

स्मरणशक्ती वाढते - प्राण्यांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आलं की, या काटेरी झाडांच्या जेलमध्ये स्मरणशक्ती वाढवण्याची शक्ती आहे. याच्या सेवनाने डिप्रेशन कमी केलं जाऊ शकतं.

अ‍ॅलोव्हेरा जेलचे इतर फायदे - या जेलमुळे वजन कमी करण्यास मदत मिळते, हेपेटायटिसवर उपचार होऊ शकतात, त्वचेसंबंधी रोग दूर होतात, वजन कमी होतं, शरीरावरील सूज कमी होते असे अनेक फायदे होतात.

काय काळजी घ्यावी - अ‍ॅलोव्हेरा जेलचं सेवन करताना या गोष्टीची काळजी घ्या की, गर्भवती महिलांना हे नुकसानकारक ठरू शकतं. तसेच याने पोटासंबंधी समस्याही वाढू शकतात. यातून निघणारा पिवळा पदार्थ लॅटेक्सचं सेवन करणं टाळा.