हाडं होतील मजबूत, वजन होईल कमी; काबुली चणे खाण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्... By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 04:22 PM 2024-08-30T16:22:29+5:30 2024-08-30T16:51:06+5:30
Kabuli Chana Benefits : अनेकांना यापासून मिळणारे फायदे माहीत नसतात. आज आम्ही तुम्हाला याच काबुली चण्यांचे आरोग्याला काय काय फायदे होतात ते सांगणार आहोत. काबुली चण्यांची भाजी भरपूर लोक आवडीनने खातात. तसेच काबुली चण्यांचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्येही केला जातो. यांची टेस्ट तर चांगली लागतेच सोबतच यांचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. लहान मुलांना सुद्धा काबुली चण्यांचे वेगवेगळे पदार्थ खूप आवडतात. पण अनेकांना यापासून मिळणारे फायदे माहीत नसतात. आज आम्ही तुम्हाला याच काबुली चण्यांचे आरोग्याला काय काय फायदे होतात ते सांगणार आहोत.
ब्लड शुगर कंट्रोल राहते काबुली चण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे डायबिटीसच्या रूग्णांसाठी हे एक पौष्टिक आहार ठरतात. यांच्या सेवनाने ब्लड ग्लूकोज लेव्हल कमी होते.
प्रोटीन काबुली चणे बेस्ट प्लांट बेस्ड प्रोटीन आहे. हे चणे व्हेजिटेरिअन आणि वीगन डाएट फॉलो करणाऱ्यांसाठी प्रोटीनचा मोठा स्त्रोत असतात.
हृदयसाठी फायदेशीर काबुली चण्यामधील फायबर रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. ज्यामुळे हृदय निरोगी राहतं.
हाडे मजबूत होतात काबुली चण्यांमध्ये कॅल्शिअम, झिंक आणि व्हिटॅमिन आढळतं. जे हाडांना मजबूत ठेवण्याचं काम करतात.
बद्धकोष्ठता होते दूर काबुली चण्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. या फायबरने बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत मिळते. तसेच पचनक्रियाही चांगली होते.
वजन कमी होतं काबुली चण्यांच्या सेवनाने जंक फूड खाण्याच ईच्छा कमी होते. यांच्या सेवनाने पोट जास्त वेळ भरून राहतं आणि वजन कमी करण्यास मदत मिळते.
झोप चांगली लागते काबुली चण्यांमध्ये कोलीन नावाचं तत्व आढळतं. ज्याने झोप चांगली लागते. तसेच स्मरणशक्तीही मजबूत होते.