Best out of waste: शास्त्रज्ञांनी तयार केलं फळांच्या सालीपासून बँडेज; काहीच क्षणांत जखम बरी होणार By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 05:01 PM 2021-10-05T17:01:16+5:30 2021-10-05T17:40:12+5:30
जखम झाल्यावर आपण कापड, जंतूनाशक असलेलं बँडेज आपण वापरतो. हळद वगैरे नैसर्गिक जंतूनाशकही कधी कधी जखमेवर लावतो. पण शास्त्रज्ञांनी आता चक्क फळांच्या सालीपासून मलमपट्टी तयार केली आहे. हे बँडेज नेमके कसे तयार केले गेले जाणून घेऊया... शास्त्रज्ञांनी फळांच्या सालीचा वापर करून फळांच्या कचऱ्यापासून अशी मलमपट्टी तयार केली आहे, जी थेट जखमेवर लावता येऊ शकेल. विशेष म्हणजे याच्या उपचारानंतर आपल्याला जखम कमी करण्यात ते फायदेशीरही ठरणार आहे. त्यामुळं आता या संशोधनाचा आपल्या आरोग्याला फायदा होणार आहे.
सिंगापूरमध्ये फणस (Durian) हे खूप मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. या फळाची साल आणि कचऱ्याचे प्रमाण खूप जास्त आहे. अशा स्थितीत शास्त्रज्ञांनी त्याच्या सालीतून सेल्युलोज पावडर काढून त्याचे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणाऱ्या पट्ट्यांमध्ये रूपांतर करण्याचे ठरवले आहे..
सिंगापूरमधील नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या (Nanyang Technological University) शास्त्रज्ञांनी या प्रयोगात कचऱ्यामध्ये फेकलेल्या फळाच्या सालीचा वापर केला आहे.
फळांच्या सालीमध्ये सापडलेल्या गुणधर्मांचा वापर करून बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंध करणारी पट्टी तयार केली गेली आहे.
फळांच्या सालीमध्ये सापडलेल्या गुणधर्मांचा वापर करून बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंध करणारी पट्टी तयार केली गेली आहे.
फळांच्या सालीमध्ये सापडलेल्या गुणधर्मांचा वापर करून बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंध करणारी पट्टी तयार केली गेली आहे.
यामुळे फळांच्या सालीचा पुनर्प्रक्रिया करून पुनर्वापर करता येईल आणि किफायतशीर पट्टीमध्ये लोकांसाठी उपचारही होतील हा हेतू यामागे शास्त्रज्ञांचा आहे.
शास्त्रज्ञांनी ड्यूरियनची (Durian) साल वाळवली, त्यात ग्लिसरॉल टाकून त्याचे गुळगुळीत आणि मऊ हायड्रोजेलमध्ये रूपांतर केले.
एनटीयूमधील (NTU) अन्न आणि विज्ञान कार्यक्रमाचे संचालक प्रा.विलियम चेन यांच्या मते, सिंगापूर दरवर्षी सुमारे 12 दशलक्ष ड्यूरियन वापरतो. ज्यामध्ये साल आणि बियाणे लगदा खाल्ल्यानंतर वाया जातात.
आंब्याच्या सालीमध्ये जीवाणू नाशक सामग्री असते तर धान्य आणि फळांच्या साली यापेक्षा खूपच स्वस्त असतात. वैद्यकीय सुधारणा होण्याबरोबरच या शोधाचा पर्यावरणालाही मोठा फायदा होणार आहे.