सफरचंद सोलुन खाण्याचे आहेत इतके तोटे की समजल्यावर सफरचंदाची साल कधीच काढणार नाही By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 02:45 PM 2022-05-23T14:45:33+5:30 2022-05-23T15:45:22+5:30
सफरचंदाचे अनेक गुणधर्म तुम्हाला माहित असतील. त्यामुळेच हे फळ अनेकजण आवडीने खातात. पण जर तुम्ही याची साल काढत असाल आणि त्याचे सेवन करत असाल तर हे अत्यंत धोकादायक ठरु शकते. कारण याचे तोटे गंभीर आहेत. असं म्हणतात की रोज एक सफरचंद खाल्ल्यामुळे डॉक्टर दुर राहतात. त्यामुळे बरेचजण अगदी आवर्जुन सफरचंद खातात.
पण काहीजण सफरचंद खाताना त्याची साल काढुन खातात. असं करणं धोक्याचं आहे.
सफरचंद खाल्ल्यामुळे अनेक आजारांचा धोका टळतो. मग अशावेळी साल का काढायची?
चला याचेच तोटे जाणून घेऊ.
सफरचंदाचा वजन घटवण्यामध्ये फायदा होतो. याच्या सालीमध्ये युरसोलिक अॅसिड असते त्यामुळे पोटावरील चरबी कमी होते व वजन झटपट कमी होते.
ज्या लोकांना श्वसनाचा त्रास होतो त्यांनी सफरचंदाचे सेवन केले पाहिजे. सफरचंदाच्या सालीत क्युरसेटिन नामक घटक असतो ज्यामुळे श्वसनाच्या सर्व विकारांवर आराम मिळतो.
डॉक्टर नेहमी सफरचंद सालीसकट खाण्याचा सल्ला देतात कारण...
संपूर्ण सफरचंदात ए व्हिटॅमिन ९८ इंटरनॅशनल युनिट असते तर सी व्हिटॅमिन ८.५ मिलीग्रॅम असते. साल काढल्यामुळे ए व्हिटॅमिन ६० युनिटवर येते तर सी व्हिटॅमिन ६.५ मिलीग्रॅम इतके कमी होते.
एका मिडियम साईज सफरचंदात ४.५ ग्रॅम फायबर असते. सफरचंदाची साल काढुन टाकताच ते २ ग्रॅमवर येते यावरुन लक्षात येते की सफरचंदाच्या सालीतच सर्वात जास्त फायबर असते.
अमेरिकेच्या कॉर्नल युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार सफरचंद सालासकट खाल्ल्यामुळे पोट, लिव्हर आणि ब्रेस्ट कॅन्सरमध्ये रक्तपेशी निर्माण होण्यास मदत होते.