कारल्यासोबत 'या' गोष्टींचं सेवन ठरू शकतं घातक, डॉक्टरांकडे जाण्याची येईल वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 12:04 PM2024-08-26T12:04:07+5:302024-08-26T12:18:23+5:30

Bitter Guard : कारल्यासोबत काही गोष्टींचं सेवन केलं तर समस्या होऊ शकतात. त्याच आज आपण जाणून घेणार आहोत.

Foods To Avoid With Bitter Guard : कारल्याची भाजी भरपूर लोक आवडीने खातात. कारल्याच्या भाजीने शरीराचा अनेक आजारांपासूनही बचाव होतो. पण कारल्याची भाजी तुम्हाला आजारी देखील पाडू शकते. जर तुम्ही काही चुकीच्या गोष्टींसोबत याचं सेवन केलं तर तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची वेळ येऊ शकते. आयुर्वेदात विरूद्ध आहार घेण्यास मनाई आहे. जर विरूद्ध आहार घेतला तर पोटासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात.

आयुर्वेदात अनेक आजारांवर उपचार सांगण्यात आले आहेत. तसेच यात खाण्या-पिण्याच्या पद्धतीबाबतही सांगण्यात आलं आहे. आयुर्वेदात काही गोष्टींचं एकत्र सेवन करण्यास मनाई करण्यात आली आहे. कारल्यासोबत काही गोष्टींचं सेवन केलं तर समस्या होऊ शकतात. त्याच आज आपण जाणून घेणार आहोत.

अनेक शोधांनुसार, कारल्याच्या भाजीमध्ये फायबर, कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६, फोलेट, व्हिटॅमिन ए यांसारखे पोषक तत्व असतात. यांनी डायबिटीस, कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा दूर करण्यास मदत मिळते.

एका रिपोर्टनुसार, कारल्याची भाजी खाल्ल्यावर किंवा ज्यूस प्यायल्यावर दुधाचं सेवन करू नये. याने शरीराचं फार नुकसान होतं. दोन्ही गोष्टींचं एकत्र सेवन केल्याने छातीत जळजळ आणि आतड्यांची समस्या होऊ शकते. इतकंच नाही तर याने बद्धकोष्ठतेची समस्या देखील होते.

आंबे खाणं सगळ्यांनाच आवडतं. पण जर तुम्ही कारले आणि आंबे सोबत खाल्ले तर वेळीच सावध व्हा. असं केल्याने अॅसिडिटी, छातीत जळजळ आणि मळमळ होण्याचा धोका असतो.

मूळा आणि कारले सोबत खाल्ल्याने हा विरूद्ध आहार असतो. या मिश्रणाने शरीराचं नुकसान होऊ शकतं. यामुळे पोटात गॅसची समस्या होऊ शकते आणि कफही होऊ शकतो.

भेंडी सुद्धा कारल्यासोबत किंवा लगेच नंतर खाणं टाळली पाहिजे. यामुळे डायजेशन खराब होऊ शकतं.

या लिस्टमध्ये दही शेवटी आहे. दही आणि कारले सोबत खाल्ल्याने त्वचेसंबंधी एलर्जी होण्याचा धोका असतो. त्वचेवर रॅशेज किंवा चट्टे येऊ शकतात.