Bad Causes habits to cause kidney failure myb
किडनी खराब व्हायला 'या' सवयी ठरतात कारणीभूत, वाचाल तरच वाचाल By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 12:16 PM2020-04-07T12:16:37+5:302020-04-07T12:40:54+5:30Join usJoin usNext सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत अनेकांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळे शरीरातील अनेक अवयव डॅमेज होतात. नकळतपणे वाढत्या वयात किडनी, हृदयाच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात. किडनी हा शरीरातील महत्वाचा अवयव आहे. कारण हृदयाला रक्तप्रवाह होण्याआधी किडनीमधून फिल्टर केलं जातं. किडनी मुत्राच्या माध्यमातून शरीरातील टॉक्सिन्सना बाहेर टाकते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडले नाही तर नुकसान होऊ शकतं. त्यासाठी तुमच्या वाईट सवयी कारणीभूत ठरत असातात. या सवयी तुम्ही आजच्या आजचं बदलायला हव्यात. पेनकिलर घेतल्यानंतर तुम्हाला शरीराच्या दुखण्यापासून आराम मिळत असला तरी संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम होत असतात. त्यामुळे किडनीवर परिणाम होऊन रक्तप्रवाह असुरळित होऊ शकतो. जास्तीत जास्त पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर निघून जाण्यास मदत होते. किडनी स्टोनसारख्या समस्या निर्माण होऊ नये असं वाटत असेल तर रोज ८ ते १० ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. मदयाचं अतिसेवन केल्याने शरीरातील विषारी घटक वाढून किडनीवर परिणाम होतो. क्रोनिक किडनी डिसीज होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे किडनीवर नकारात्मक परिणाम होत असतो. जास्तवेळ बसून राहिल्यामुळे मुत्राशयाशी निगडीत आजार होण्याचा धोका असतो. किडनी तसंच मानेच्या आणि पाठीच्या कोणत्याही प्रकारच्या आजारापासून वाचण्यासाठी सतत बसून राहू नका. काम करतानामध्ये गॅप घ्या. जास्त मीठ आणि साखरेचं सेवन केल्याने सुद्धा रक्तदाब वाढतो. शरीरात सोडीयमचं प्रमाण अधिक झाल्याने किडनीच्या समस्या उद्भवतात. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चांगल्या झोपेची आवश्यकता असते. जर तुमची झोप चांगली झाली नाही शारीरिक संतुलन बिघडून कोणतीही समस्या उद्भवू शकते.टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यHealth TipsHealth