केळी + दूध = आरोग्यासाठी धोकादायक; जाणून घ्या, आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हे का आहे बॅड कॉम्बिनेशन?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 01:04 PM2024-07-08T13:04:22+5:302024-07-08T13:17:36+5:30

Banana And Milk : आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून केळी आणि दुधाचे मिश्रण हानिकारक का मानलं जातं? ते जाणून घेऊया...

केळी आणि दूध, हे दोन स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ अनेकदा एकत्र खाल्ले जातात. मात्र आयुर्वेदानुसार या दोन्हींचं एकत्रित सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.

केळी आणि दूध एकत्र करून खाल्ल्याने पोट फुगणे, गॅस, अपचन आणि जुलाब यांसारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात असं म्हणतात. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून केळी आणि दुधाचे मिश्रण हानिकारक का मानलं जातं? ते जाणून घेऊया...

केळीमध्ये 'थंड' आणि 'गोड' गुणधर्म आहेत, तर दुधात 'थंड' आणि 'रसक' गुणधर्म आहेत असं आयुर्वेदात मानलं जातं. वेगवेगळे गुणधर्म असलेले पदार्थ एकत्र केल्यानंतर होणारा आहार हा चांगला नसतो, जो आयुर्वेदात हानिकारक मानला जातो.

चांगला आहार नसल्यामुळे पचनक्रिया कमकुवत होते. तसेच अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. केळी आणि दुधाच्या मिश्रणामुळे पोट फुगणे, गॅस, अपचन आणि अतिसार यांसारख्या पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात.

काही लोकांना केळी किंवा दुधाची एलर्जी असू शकते. एलर्जी असलेल्या लोकांमध्ये, या मिश्रणाच्या सेवनाने त्वचेवर पुरळ उठणे, खाज येणे,सूज येणे आणि ओटीपोटात दुखणे यासारख्या एलर्जीक प्रतिक्रिया होऊ शकतात.

केळी आणि दूध एकत्र करून खाल्ल्यामुळे दमा किंवा ब्राँकायटिस सारख्या श्वसन समस्या उद्भवू शकतात. मात्र हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की प्रत्येक व्यक्तीसोबत अशा प्रकारच्या गोष्टी घडत नाहीत.

काही लोक केळी आणि दूध एकत्र करून खातात, त्यांना कोणतीही समस्या होत नाही. मात्र केळी किंवा दूध खाल्ल्यानंतर तुम्हाला आरोग्यविषयक कोणतीही समस्या जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.