किडनीसाठी फार नुकसानकारक आहे या 5 सवयी, फिट राहण्यासाठी आजच सोडा By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 11:29 AM 2022-10-05T11:29:28+5:30 2022-10-05T11:36:20+5:30
Bad habits for kidney : हळूहळू यामुळे शरीरात अनेक समस्या वाढतात. अशात गरजेचं असतं की, किडनीची योग्य ती काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला किडनी खराब होण्याच्या 5 सवयींबाबत सांगणार आहोत. Bad Habits for Kidney: किडनी आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. याच्या माध्यमातून शरीरातील जास्तीचं फ्लूइड आणि विषारी तत्व बाहेर काढले जातात. जर एखाद्या कारणाने किडनी खराब होत असेल तर शरीरातून नुकसानकारक तत्व बाहेर निघू शकत नाहीत. हळूहळू यामुळे शरीरात अनेक समस्या वाढतात. अशात गरजेचं असतं की, किडनीची योग्य ती काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला किडनी खराब होण्याच्या 5 सवयींबाबत सांगणार आहोत.
पाणी कमी पिणं नुकसानकारक - तुमच्या किडनीने योग्य प्रकारे काम करावं यासाठी दिवसातून 5 ते 7 लिटर पाणी पिण्याची गरज आहे. जर तुम्ही रोज कमी पाणी पित असाल तर तुमची किडनी हळूहळू गंभीर स्थितीत जाईल. पाण्याच्या माध्यमातूनच किडनी शरीरातील विषारी टॉक्सिन बाहेर काढते.
शुगरचं जास्त सेवन - जेवणात गोड काही खाणं चुकीचं नाही. पण जास्त प्रमाणात शुगर असलेले गोड पदार्थ खाल तर याने किडनी डॅमेज होऊ शकते. सोबतच जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने तुम्ही डायबिटीसचेही शिकार होऊ शकता. त्यामुळे शक्यतो जास्त गोड पदार्थ खाणं टाळा.
पुरेशी झोप न घेणे - रोज 7 ते 8 तास चांगली झोप घेणं शरीराच्या फिटनेससाठी फार गरजेचं आहे. याने शरीराच्या महत्वाच्या अवयवांना आराम मिळतो. जर तुम्ही यापेक्षा कमी वेळाची झोप घेत असाल तर किडनीसहीत अनेक महत्वाच्या अवयवांवर याचा वाईट परिणाम होतो. ज्यामुळे तुम्हाला अनेक आजारही होऊ शकतात.
पेनकिलरचं जास्त सेवन करणं - अनेकदा लोक आजारी पडल्यावर पेनकिलर खातात. पण कधी कधी असं केल्यास हरकत नाही. पण तुम्ही जर नेहमीच याचं जास्त सेवन करत असाल तर याने तुमच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. मुळात औषधांमध्ये सोडिअम असतं, जे साफ करण्यासाठी किडनीला फार जास्त शक्ती लावावी लागते. जर तुम्ही जास्त औषधांचं सेवन करत असाल तर त्यातील सॉल्ट साफ करण्यात तुमची किडनी फेलही होऊ शकते. ज्यामुळे तुमच्या जीवाला धोकाही होऊ शकतो.
जेवणात जास्त मीठ खाणं - जेवणाची टेस्ट वाढवण्यासाठी, सोडिअमची शरीरात कमतरता होऊ नये म्हणून मीठ खाणं गरजेचं आहे. पण त्याचं प्रमाण कमी असावं. गोड पदार्था प्रमाने तुम्ही जर मीठ जास्त खात असाल तर त्याचेही साइड इफेक्ट होत असतात. असं केल्याने तुमच्या किडनीचं नुकसान होतं. त्यामुळे कमी प्रमाणात मिठाचं सेवन करा.