कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर शरीर देतं 'हे' ५ संकेत; दुर्लक्ष करणं पडेल महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 04:14 PM2022-07-23T16:14:22+5:302022-07-23T16:33:00+5:30

Cholesterol : हृदयविकाराचा झटका येणे, हे उच्च कोलेस्ट्रॉलचे सर्वात धोकादायक लक्षण आहे.

रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल वाढणे ही शरीरासाठी धोक्याची घंटा आहे, कारण त्यामुळे उच्च रक्तदाब (High Blood Pressure), हृदयविकाराचा झटका (Heart Attack), कोरोनरी आर्टरी डिसीज (Coronary Artery Disease) आणि ट्रिपल व्हेसल डिसीज (Triple Vessel Disease) यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

हृदयविकाराचा झटका (Heart Attack): हृदयविकाराचा झटका येणे, हे उच्च कोलेस्ट्रॉलचे सर्वात धोकादायक लक्षण आहे. रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यामुळे दाब वाढतो, नंतर हे हृदयविकाराचे कारण बनते.

उच्च रक्तदाब (High Blood Pressure): उच्च रक्तदाब ही एक समस्या आहे, जी कोलेस्ट्रॉलच्या पातळीत वाढ दर्शवते आणि हे शोधणे खूप सोपे आहे, आजकाल लोक घरी बीपी मशीन ठेवतात.

नखांच्या रंगात बदल (Change In Nail Colour): जेव्हा रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल मर्यादेपलीकडे वाढते, तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि कमी रक्तपुरवठा झाल्यामुळे गुलाबी दिसणार्‍या नखांचा रंग अचानक पिवळा होतो. त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

अस्वस्थता (Restlessness): जेव्हा कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, तेव्हा अस्वस्थता देखील वाढते, तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो, मळमळ, थकवा, छातीत दुखणे वाढते. ही एक सामान्य समस्या मानू नका आणि त्वरित चाचणी घ्या.

पाय बधीर होणे (Numbness Of Feet): उच्च कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत तुमचे पाय अचानक बधीर होऊ शकतात, कारण नसांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे पायांना होणारा रक्तपुरवठा थांबतो किंवा कमी होतो.

(Disclaimer: वरील दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी वैद्यकीय सल्ला जरूर घ्या.)