bad impact of cigarette smoking on human health
'हे' वाचाल तर धूम्रपान कायमचं सोडाल! By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 03:20 PM2019-04-07T15:20:37+5:302019-04-07T15:25:20+5:30Join usJoin usNext धूम्रपानाची सवय शरीरासाठी अतिशय घातक असते. त्यामुळे अनेक व्याधींना निमंत्रण मिळतं. अत्याधिक धूम्रपानामुळे श्वसनाच्या क्षमतेवर परिणाम होतो. एखाद्या गोष्टीचा वास पटकन लक्षात येत नाही. धुम्रपानामुळे चेहऱ्याचा तजेला कमी होतो. त्यामुळे म्हातारपणाऱ्या खुणा दिसू लागतात. सिगारेट ओढणाऱ्यांच्या तोंडाला वास येतो. त्याचा त्रास इतरांना होतो. धुम्रपानामुळे डोळ्यांच्या क्षमतेवर परिणाम होता. सिगारेट ओढणाऱ्यांना हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय दमा, कर्करोग, पक्षाघात होण्याचीही धोका असतो. सिगारेटमुळे केवळ फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढत नाही. तर मूत्राशय, गर्भाशय, किडनी यांच्यावरही परिणाम होतो. छातीचे 200 एक्स-रे काढल्यावर जितके रेडिएशन निघतात, तितके रेडिएशन एक पॅकेट सिगारेट ओढल्यावर निघतात. ज्याचा शरीरावर परिणाम होतो. सिगारेट ओढल्यानं शूक्राणूंची संख्या कमी होते. यासोबतच त्यांच्या गुणवत्तेवरदेखील परिणाम होतो.टॅग्स :धूम्रपानआरोग्यकर्करोगSmokingHealthcancer