beauty and health benefits of flowers
'ही' 5 फुलं आरोग्यासाठी ठरतात फायदेशीर; जाणून घ्या फायदे! By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 03:45 PM2018-10-14T15:45:06+5:302018-10-14T15:49:15+5:30Join usJoin usNext फुलं आणि त्यांच्या सुगंधामुळे मन प्रसन्न होतं. याव्यतिरिक्त काही फुलं आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी फायदेशीर ठरतात. जाणून घेऊयात कोणत्या फुलांचा आरोग्यासाठी आणि सौंदर्य वाढवण्यासाठी उपयोग होतो. गुलाबाची पानं दूधामध्ये उकळून दररोज प्यायल्याने बद्धकोष्ठाची समस्या दूर होते. त्याचबरोबर दूधाच्या पाकळ्या दूधासोबत वाटून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा उजळण्यास मदत होते. सूर्यफूलाच्या पाकळ्या नारळाच्या तेलामध्ये मिक्स करून काही दिवसांपर्यंत उन्हात ठेवा. या तेलाने शरीराला मालिश करा. यामुळे त्वचेच्या सर्व समस्या किंवा इन्फेक्शन दूर होण्यास मदत होईल. दातांच्या दुखण्यावर किंवा हिरड्यांवर सूज आली असल्यास जुईची पानं खाणं फायदेशीर ठरतं. जुईच्या झाडाची पानं चावून, बराच वेळ त्याचा रस तोंडात तसाच ठेवा. त्यानंतर काही वेळाने पाण्याने चुळ भरा. असं केल्याने दातांच्या तक्रारी दूर होतात. जास्वंदाच्या लाल फुलांचा उपयोग डायबिटीज आणि हृदयाशी संबंधित आजारांवर फायदेशीर ठरतो. यासाठी ही फुलं वाटून साखरेसोबत खावी. याव्यतिरिक्त महिलांच्या मासिक पाळीच्या तक्रारींवरही जास्वंदाचं फुल गुणकारी ठरतं. माउथ अल्सरच्या समस्येने त्रस्त आहात? चमेलीच्या पानांचा वापर करणं ठरेल फायदेशीर. चमेलीच्या झाडाची पानं चावल्याने माउथ अल्सरपासून सुटका होते. याव्यतिरिक्त सकाळी चमेलीची फुलं डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यHealth TipsHealth