होळी खेळून झाल्यानंतर तुमच्याही त्वचेवरचा रंग लवकर जात नाही? मग वापरा 'या' २ सोप्या ट्रिक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 18:38 IST2025-03-11T18:26:12+5:302025-03-11T18:38:02+5:30

How to Remove Holi Colors on Skin : होळी खेळणे जितके मजेदार, तितकेच त्यानंतर अंगाला लागलेला रंग काढून टाकण्यासाठी मेहनत घ्यावी लागते.

होळी खेळणे जितके मजेदार असते, तितकेच त्यानंतर अंगाला लागलेला रंग काढून टाकण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. तुम्ही कितीही तेल लावले तरी त्वचेवर थोडासा रंग राहतोच.

दोन दिवसांनी येणाऱ्या होळीआधी या २ ट्रिक्स लक्षात घ्या. त्याने तुमच्या त्वचेवरचा रंग जाण्यास नक्कीच फायदा होईल. यातील एक ट्रिक आधी तर एक ट्रिक नंतर करायची आहे.

होळीच्या आधी आपण ज्याप्रमाणे चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागावर तेल लावतो, त्याचप्रमाणे तुम्हाला क्रीम आणि सनस्क्रीन मिसळून ते लावावे लागेल.

तुम्ही असे केल्याने, होळी खेळून आल्यानंतर जेव्हा तुम्ही आंघोळ कराल, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरील रंग निघून जायला मदत होईल. हा उपाय होळी खेळण्यापूर्वी वापरायचा आहे.

रंगांचे डाग काढण्यासाठी एक रेसिपी तयार करा. त्यात २ चमचे टोमॅटो पेस्ट, १ चमचा कॉफी, १ चमचा दही आणि २ चमचे तांदळाचे पीठ यांचे मिश्रण एकजीव करा.

सर्व गोष्टी एकत्रित मिसळून झालयानंतर हे मिश्रण तुम्ही हातानेच तुमच्या चेहऱ्यावर आणि त्वेचवर लावा. या घरगुती मिश्रणाच्या त्वचेवरील सर्वप्रकारचे गडद रंग जायला मदत होईल.