benefits of laughter reduce risks of heart attack
दिलखुलास हसण्याचे हे आहेत फायदे, हार्टअटॅकचा धोकाही होतो कमी By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 03:43 PM2018-07-12T15:43:43+5:302018-07-12T15:51:51+5:30Join usJoin usNext हृदयविकाराचा कमी धोका - हसण्यामुळे हृदयाचा व्यायाम होतो. रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. हसण्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता कमी होते, असे काही संशोधनाद्वारे समोर आले आहे. तणाव कमी होतो - तणावामुळे बहुतेक लोक निराश आणि मानसिकरित्या खचलेले दिसतात. या समस्येविरोधात लढण्यासाठी हसणं हा एक उत्तम उपाय आहे. हसण्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. काही जणांना घराबाहेर पडण्यास, किंवा कोणासोबतही बोलण्यास, माणसांच्या गर्दीत जाण्याची भीती वाटते. अशा व्यक्ती घरी एकटं राहणं पसंत करतात. या मानसिक आजाराविरोधात लढण्यासाठी हसणं हे एक चांगले औषध आहे. जेव्हा आपण हसतो तेव्हा आपले शरीर एंड्राफिन नावाचे रसायन शरीराबाहेर फेकते. ही प्रक्रिया शरीरासाठी खूप चांगली मानली जाते. यामुळे आपल्या शरीराला शांतता मिळते, असे डॉक्टरांचं म्हणणं आहे. जर रात्रीची झोप येत नसेल तर हसणं हा त्यावर एक चांगला उपाय आहे. असं म्हणतात हसण्यामुळे आपण नेहमी तरुण राहतो. हसण्यामुळे आपल्या चेहऱ्याचे 15 प्रकारचे स्नायू एकत्रितरित्या काम करतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सHealthHealth Tips