रोज सकाळी रिकाम्या पोटी खा एक लवंग, लिव्हर होईल मजबूत अन् इम्यूनिटीही वाढेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 12:23 PM2024-10-02T12:23:30+5:302024-10-02T12:46:13+5:30

Clove Health Benefits : सकाळी रिकम्या पोटी लवंग खाण्याचे काय काय फायदे होतात हे जाणून घेऊया.

Cloves Health Benefits : किचनमधील अनेक मसाल्यांना आयुर्वेदात फार महत्व आहे. अनेक मसाले हे औषधींचा भांडार मानले जातात. वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी या मसाल्यांचा वापर केला जातो. भारतीय किचनमधील असाच एक मसाला म्हणजे लवंग. लवंग दिसायला जरी छोटी असली तर याचे फायदे भरपूर आहेत. सकाळी रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने पोटासंबंधी अनेक समस्या दूर होतात. अशात सकाळी रिकम्या पोटी लवंग खाण्याचे काय काय फायदे होतात हे जाणून घेऊया.

हेल्थलाईनच्या एका रिपोर्टनुसार, लवंगमध्ये व्हिटॅमिन, फायबर, प्रोटीन, आयर्न, कॅल्शिअम, पोटॅशिअम, फॉस्फोरस, मॅगनीज, कार्बोहायड्रेट आणि अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट्स आढळतात. हे तत्व अनेक आजारांचा धोका कमी करतात.

लिव्हर शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. याद्वारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात. अशात लिव्हर नेहमीच हेल्दी राहणं फार गरजेचं असतं. जर तुम्ही नियमितपणे लवंग खाल तर तुमचं लिव्हर हेल्दी राहणार.

शरीराला आजारांपासून वाचवण्यासाठी गरजेचं आहे की, आपली इम्यूनिटी मजबूत रहावी. लवंगमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं आणि सोबतच यात अॅंटी-ऑक्सिडेंट्सही असतात. जर लवंग रिकाम्या पोटी खाल तर याने पांढऱ्या रक्तपेशी देखील वाढतात. तसेच शरीराची इम्यूनिटी सुद्धा वाढते.

जर तुमच्या दातांमध्ये वेदना होत असेल तर लवंगचा वापर करू शकता. लवंगमध्ये एनाल्जेसिक गुण असतात जे दातांचं दुखणं कमी करतात. इतकंच नाही तर डोकेदुखी होत असेल तर तुम्ही याच्या तेलाचा सुगंध घेऊ शकता. याने लगेच आराम मिळेल. जर हिरड्यांमध्ये इन्फेक्शन झालं असेल तर लवंगाच्या पाण्याने गुरळा करा.

वेगवेगळ्या कारणांनी तोंडाची दुर्गंधी येते. अशात लोक तुमच्यापासून दूर पळतात. तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. मात्र, केवळ लवंगच्या मदतीने तुम्ही ही समस्या दूर करू शकता.

लवंग हाडांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. जर हाडं कमजोर असतील तर तुम्ही सकाळी झोपेतून उठून दोन लवंग चावून खाव्यात. यात मॅगनीज भरपूर असतं. ज्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत मिळते.

लवंगमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुण आहेत. लवंग गरम असल्याने हिवाळ्यात याचं सेवन करण्याचं महत्त्व आणखीन वाढतं. त्यामुळे याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. अशात हिवाळ्यात लवंगाचा चहा सेवन केल्यास फायदा होतो.

लवंगाचा चहा तयार करण्यासाठी चार ते पाच लवंग उकडून घ्या. यात मध मिश्रित करुन दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन करा. याने अस्थामाच्या रुग्णांना फायदा होतो.