थंडीपासून संरक्षण अन् हृदयासाठी लाभदायी; हिवाळ्यात रोज पिस्ता खाण्याचे फायदे, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 01:35 PM2023-10-26T13:35:22+5:302023-10-26T14:15:11+5:30

हिवाळ्यात पिस्ता खाल्लामुळे तुमचे शरीर आतून उबदार ठेवण्यास मदत होते.

हिवाळ्यात आपल्याला अशा पदार्थ खावेसे वाटतात, ज्यामुळे आपले शरीर उबदार राहण्यास मदत होते. यासाठी तूप, गूळ, आले अशा अनेक गोष्टी खाल्ल्या जातात, पण तुम्हाला माहित आहे का? हिवाळ्यात खाण्यासाठी पिस्ता हा सर्वात चांगला ड्राय फ्रूट आहे.

पिस्ता हे एक उष्ण प्रकृतीचे ड्राय फ्रूट आहे, त्यामुळे हिवाळ्यात ते तुम्हाला आतून उबदार ठेवण्यास मदत करते, याशिवाय ते तुमच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे, म्हणूनच हिवाळ्यातील हे उत्तम ड्राय फ्रूट मानले जाते.

तुम्ही पिस्ता अनेक पदार्थांमध्ये घालूनही खाऊ शकता. हिवाळ्यात पिस्ता खाल्लामुळे तुमचे शरीर आतून उबदार ठेवण्यास मदत होते. पिस्ता रोज खाल्ल्याने सर्दी-खोकला यांसारखे आजार टाळता येतात. पिस्त्यामध्ये असलेले फॅटी अॅसिड, जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील ऊर्जा देतात.

पिस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, जे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून अनेक आजार टाळता येतात, त्यामुळे हिवाळ्यात पिस्त्याला आपल्या आहाराचा भाग बनवा.

पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन ई आढळते, जे तुमच्या त्वचेसाठी चांगले असते. हे नैसर्गिकरित्या तुमच्या त्वचेची लवचिकता वाढवते, ज्यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात. तसेच, पिस्त्यामध्ये अनेक फॅटी अॅसिड असतात, जे त्वचेला मॉइश्चरायझ ठेवण्यास मदत करतात.

पिस्ता तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतो. चांगले कोलेस्टेरॉल तुमच्या हृदयासाठी फायदेशीर आहे, यामुळे अनेक हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी होतो.

बायोटिन केसांसाठी खूप फायदेशीर आहे. बायोटिनच्या कमतरतेमुळे केस गळणे, कोंडा होणे, कोरडेपणा इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात. पिस्त्यामध्ये बायोटिन मुबलक प्रमाणात आढळते, जे केसांना मजबूत आणि मॉइश्चरायझ करते. त्यामुळे केस कमी तुटतात आणि कोरडेपणाही कमी होतो.

पिस्त्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे तुम्ही जास्त मर्यादेपेक्षा जात खाऊ शकत नाही. जास्त न खाल्ल्याने तुमचे वजन वाढत नाही आणि उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी होतो.

Disclaimer: दरम्यान, याठिकाणी देण्यात आलेली माहिती केवळ केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने दिली आहे. त्यामुळे आपल्याला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.