Summer tips: उन्हाळ्यात अननसाच्या सेवनाचे आहेत इतके फायदे की 'या' आजारांना म्हणाल कायमचे Bye! By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 05:12 PM 2022-03-27T17:12:05+5:30 2022-03-27T17:22:16+5:30
उन्हाळ्याच्या दिवसात अननस खाणं, अननसचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरतं. अननसमुळे शरीरातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. उन्हाळ्यात अननस खाण्यामुळे शरीराला उर्जा मिळते. जाणून घेऊया अननस खाण्याचे सर्व फायदे. अननस खायला अनेकांना आवडतो. अननस तसाच खाऊ शकतो, त्याचा ज्युस करता येतो. अननस खायला जितका चविष्ट आहे, तितकेच त्याचे आरोग्याला फायदे आहेत.
रक्तदाब : हृदयाशी संबंधित आजार होऊ नयेत, यासाठी व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स महत्त्वाची भूमिका बजावतात. अननसाच्या रसात हे दोन्ही घटक भरपूर असतात, त्यामुळे उन्हाळ्यात रोज दुपारी एक ग्लास अननसाचा रस प्यावा.
वजन कमी करते : उन्हाळा हा वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. व्यायाम करणे किंवा धावणे याशिवाय आहाराची काळजी घेणेही गरजेचे आहे. न्याहारीनंतर सुमारे दोन तासांनी अननसाचा रस प्यायल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते.
रोगप्रतिकारशक्ती वाढते : अननसाच्या रसाची आणखी एक खासियत म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही प्रभावी आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ खायला हवेत. आवश्यक जीवनसत्वे अननसामध्ये योग्य प्रमाणात असतात.
हाडे मजबूत होतात : अननसाचा रस हाडे मजबूत करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. वास्तविक, अननसमध्ये मँगनीज आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. याचे सेवन केल्याने हाडेच नव्हे तर दातही मजबूत होतात.
पचनसंस्था : ज्यांना अनेकदा पोटाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागते ते अननसाचा रस पिऊन त्यांची पचनक्रिया मजबूत करू शकतात. वास्तविक, यामध्ये असलेले फायबर पोटाचे आरोग्य राखण्यासाठी प्रभावी आहे.