हिवाळ्यात का दिला जातो उशीखाली लसणाची कळी ठेवून झोपण्याचा सल्ला? जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 10:41 AM2024-11-22T10:41:46+5:302024-11-22T10:56:57+5:30

Garlic In Pillow : हा एक फार जुना उपाय आहे. जो अनेक समस्या दूर करणारा आहे. चला जाणून घेऊ झोपताना उशीखाली लसणाची कळी ठेवण्याचे फायदे.

Putting Garlic Under Pillow: लसणामध्ये भरपूर प्रमाणात वेगवेगळे अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. हिवाळ्यात शरीर फीट ठेवण्यासाठी याचा फार वापर केला जातो. अनेक लोक रात्री झोपताना उशीखाली लसणाची एक कळी ठेवण्याचा सल्ला देतात. हा एक फार जुना उपाय आहे. जो अनेक समस्या दूर करणारा आहे. चला जाणून घेऊ झोपताना उशीखाली लसणाची कळी ठेवण्याचे फायदे.

लसणामध्ये व्हिटॅमिन बी ६, थायमिन, पॅंथेनिक अ‍ॅसिड, व्हिटॅमिन सी, मॅगनीज, फॉस्फोरस, कॅल्शिअम, आयर्न आणि झिंकसारखे तत्व असतात. ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. अशात उशीखाली लसणाची कळी ठेवून झोपल्याने डास कमी चावतात. तसेच याच्या गंधामुळे खोकलाही येत नाही आणि झोपही चांगली लागते.

लसणामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट गुण असतात. असं मानलं जातं की, रोज झोपताना उशीखाली लसमाची एक कळी ठेवल्याने ताप येत नाही.

हिवाळ्यात उशीखाली लसणाची एक कळी ठेवून झोपल्याने सर्दी-पडसाही होत नाही. याने इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

लसणामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असतं. झोपण्याआधी उशीखाली लसूण ठेवल्याने हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत मिळते.

हिवाळ्यात शरीरात अनेकदा झिंकची कमतरता होते. अशात उशीखाली लसणाची एक कळी ठेवल्याने शरीराला फायदा मिळतो.

ज्या लोकांना नेहमीच रात्री झोप न येण्याची समस्या होते, त्यांनी झोपताना उशीखाली लसणाची एक कळी ठेवावी. याने चांगली झोप येईल.

उशीखाली एक लसणाची कळी ठेवून झोपल्याने याच्या गंधाने आपल्याला शांत वाटतं.