Benefits of using clay bottles for water instead of plastic
पाणी पिण्यासाठी प्लास्टिकऐवजी मातीच्या बॉटलचा करा वापर; होतील 'हे' फायदे By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 11:08 AM2019-08-31T11:08:40+5:302019-08-31T11:12:07+5:30Join usJoin usNext प्लास्टिकमुळे फक्त प्रदूषण होऊन वातावरणाला नुकसान पसरत नाही तर प्लास्टिकच्या जास्त वापराने आपल्या आरोग्यालाही नुकसान पोहोचतं. एवढचं नाहीतर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोकाही अनेक पटिंनी वाढतो. कदाचित त्यामुळेच अनेक लोक प्लास्टिकऐवजी दुसरे पर्याय निवडत आहेत. त्यातीलच एक पर्याय म्हणजे मातीची भांडी... प्लास्टिक बॉटलप्रमाणे लूक मातीपासून तयार करण्यात आलेल्या बॉटल्सचा लूक प्लास्टिक किंवा काचेच्या बाटलीप्रमाणे डिझाइन करण्यात आलेला आहे. याची क्रेझ या दिवसांमध्ये फार जास्त आहे. कारण तुम्ही अगदी सहज तुमच्यासोबत कुठेही घेऊन जाऊ शकता. तुम्ही ऑफिसमध्येही ही बॉटल कॅरी करू शकता. पण थोडी काळजी घ्यावी लागते. कारण बॉटल तुटण्याचीही शक्यता असते. मातीच्या बाटलीमध्ये एक लीटरपर्यंत पाणी स्टोअर केलं जाऊ शकतं. मातीच्या भांड्यांचा ट्रेन्ड आपल्या लाइफस्टाइलमध्ये बदल घडून आल्यामुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी लोक मातीची भांजी खरेदी करायला सुरुवात करतात. यामुळेच मातीच्य भांड्याचे अनेक विविध प्रकार बाजारात पाहायला मिळतात. शहरामध्ये मातीच्या बॉटल्स व्यतिरिक्त ग्लास आणि जगसुद्धा उपलब्ध आहेत. त्वचेच्या रोगांपासून सुटका नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मातीच्या भांड्यांमध्ये ठेवलेल्या पाण्यामुळे पुरळ, पिंपल्स आणि त्वचेच्या इतर समस्या दूर होण्यास मदत होते. ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठीही मदत करतात. तसेच शरीरामधील बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आणि हार्ट अटॅकचा धोका कमी केला जाऊ शकतो. टेस्टोस्टेरॉन लेवल वाढवतं पोटाच्या सर्व समस्यांवरही मातीच्या भांड्यांमधील पाणी अत्यंत फायदेशीर ठरतं. अनिमियाच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या व्यक्तींसाठी मातीच्या भांड्यांमध्ये ठेवलेलं पाणी वरदान ठरंत. तसेच याव्यतिरिक्त प्लास्टिकमुळे शरीरामध्ये मेल हॉर्मोन टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी करतं. तेच मातीच्या भांड्यांमध्ये ठेवलेलं पाणी प्यायल्याने टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढतं आणि शरीरातील मेटाबॉलिज्म उत्तम राहतं. टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दाव करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआदी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यHealth TipsHealth