लठ्ठपणा कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्यात काय खावे? जाणून घ्या ९ बेस्ट पर्याय! By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 10:26 AM 2024-11-02T10:26:45+5:30 2024-11-02T10:53:42+5:30
Weight Loss Breakfast : तुम्ही जर वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर आज आम्ही तुम्हाला सकाळी नाश्त्या काय खाल्ल्याने मदत मिळेल ते सांगणार आहोत. Weight Loss Breakfast: सध्या जगभरातील लोक लठ्ठपणामुळे हैराण झालेले आहेत. एकदा वजन वाढलं की, ते कमी करणंही अवघड होऊन बसतं. एक शिस्तबद्ध जीवन जगाल, आहारात काही बदल कराल तर तुम्ही वजन कमी करू शकता. यात एक्सरसाईज सगळ्यात महत्वाची ठरते. सोबतच नंतर नंबर लागतो आहाराचा. दिवसभरातील आहारात सकाळच्या नाश्त्याला खूप महत्व असतं. तसेच वजन कमी करण्यासाठी देखील सकाळचा नाश्ता महत्वाचा असतो. अशात सकाळच्या नाश्त्यामध्ये काय खाता याचीही काळजी घेतली पाहिजे. तुम्ही जर वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर आज आम्ही तुम्हाला सकाळी नाश्त्या काय खाल्ल्याने तुम्हाला मदत मिळेल ते सांगणार आहोत.
सकाळच्या नाश्त्या शरीराला एनर्जी आणि पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. त्यामुळे सकाळचा नाश्ता हा हेल्दी असावा. जेणेकरून शरीराला पोषणही मिळेल आणि वजनही कमी होईल.
१) पोहे वजन कमी करण्यासाठी पोहे सगळ्यात चांगला पर्याय आहेत. कारण यात कॅलरी कमी असतात, लवकर पचन होतात. पोहे बनवताना त्यात वापरल्या जाणाऱ्या भाज्यांमधून व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फायबर मिळतं. यांनी आतड्या निरोगी राहण्यास मदत मिळते. तसेच तुमचं वजनही नियंत्रित राहतं.
२) स्प्राउट्स आणि सलाद स्प्राउट्स म्हणजेच मोड आलेले कडधान्य, सलाद हा सुद्धा वजन कमी करण्यासाठी एक बेस्ट नाश्ता आहे. हिरव्या पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळतं. पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. तसेच याने वजन कमी करण्यासही मदत मिळते. यातून फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीराला मिळतात.
३) मूग डाळीचा पोळा मोड आलेले कडधान्य खावेसे वाटत नसतील तुम्ही मूग डाळी पोळाही बनवू शकता. भरपूर प्रमाणात प्रोटीन असलेल्या मूग डाळीने हार्मोन ग्रेलिनची लेव्हल कमी करून भूकेवर कंट्रोल ठेवण्यास मदत मिळते. ज्यामुळे तुम्ही वजन कमी करू शकता.
४) दलिया दलियामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. हा एक पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता ठरू शकतो. वजन कमी करण्यासाठी दलियामध्ये काही भाज्या मिक्स केल्याने मदत मिळू शकते. वेगवेगळ्या धान्यांच्या दलियाने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि पोट जास्त वेळ भरलेलं राहतं.
५) उपमा रव्याचा उपमा हा सगळ्यांना आवडणारा नाश्ता आहे. हा एक हेल्दी आणि शरीराला पोषण देणारा नाश्ता आहे. यातून शरीराला फायबरही मिळतं. वजन कमी करण्यासाठी हा बेस्ट नाश्ता मानला जातो.
6) अंड्याचे पदार्थ अंडी हा सगळ्यात बेस्ट नाश्ता मानला जातो. यातून प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्ससारखे तत्व शरीराला मिळतात. अशात तुम्ही सकाळी नाश्त्यात फ्राइड, हाफ फ्राइड अंडे, भूर्जी, ब्रेडसोबत किंवा ऑमलेट बनवून याचं सेवन करू शकता. याने वजन कंट्रोल राहण्यास मदत मिळते.
७) ओट्स अनेक पोषक तत्व असलेल्या ओट्स आणि ओटमीलने वजन कमी करण्यास खूप मदत मिळते. यात डायटरी फायबर असल्याने पचन तंत्र सुद्धा मजबूत राहतं. यातील बीटा-ग्लूकनमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि ओव्हरईटिंग रोखलं जातं.
८) दही दह्याचा वापर वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. दही टेस्टी तर असतंच, सोबतच यातून अनेक पोषक तत्व शरीराल मिळतात. दह्यात प्रोटीन भरपूर असतं ज्यामुळे भूक कंट्रोल होते आणि पचन तंत्र मजबूत राहतं. दह्यातील सॅच्युरेटेड फॅट आणि इतर पोषक तत्व वजन कमी करण्यास मदत करतात.
९) इडली हलकी, हेल्दी इडली नाश्त्यासाठी सगळ्यात चांगला पर्याय आहे. कारण याने वजन कमी करण्यास खूप मदत मिळते. दक्षिण भारतात इडली नाश्ता सगळ्यात जास्त केला जातो. इडली हेल्दी पण असते आणि वजनही नियंत्रणात ठेवते.