वजन कमी करायचं असेल तर नाश्त्यात 'या' गोष्टींचा करा समावेश, मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 11:26 AM2024-07-12T11:26:33+5:302024-07-12T11:36:52+5:30

Weight Loss Breakfast : सकाळी नाश्त्यात काय काय असल्याने तुमचं आरोग्य चांगलं राहील हे आज जाणून घेणार आहोत.

Weight Loss Breakfast :सकाळचा नाश्ता हा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खूप महत्वाचा असतो. नाश्ता कधीच स्किप करू नये असं डॉक्टर आवर्जून सांगतात. कारण सकाळी पोटाला अन्नाची गरज असते. जर तुम्ही नाश्ता केला नाही तर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवतो. एनर्जी राहत नाही. अशात सकाळच्या नाश्त्यामध्ये काय असावं हेही तेवढंच महत्वाचं आहे. सकाळी नाश्त्यात काय काय असल्याने तुमचं आरोग्य चांगलं राहील हे आज जाणून घेणार आहोत.

नाश्त्याकडे जराही दुर्लक्ष केलं तर तुम्ही आजारी पडू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा फूड्सबाबत सांगणार आहोत ज्यात खूपसारे पोषक तत्व असतात सोबतच त्यांची टेस्टही तुम्हाला आवडेल. इतकंच नाही तर या गोष्टींचं सेवन करून तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळेल.

नाश्त्या मसाला ओट्सचं सेवन करणं एक चांगला पर्याय आहे. यात फायबरचं प्रमाण भरपूर असतं. तसेच इतरही अनेक पोषक तत्व असतात. याची टेस्टही चांगली असते. मसाला ओट्सचं सेवन करून तुम्ही वजनही कमी करू शकता.

इडली भरपूर लोकांना आवडते. पण नेहमी पारंपारिक इडलीचं सेवन करण्याऐवजी तुम्ही वेगवेगळे पोषक तत्व असलेल्या इडलीचं सेवन करू शकता. रागी एक ग्लूटेन फ्री धान्य आहे. यात फायबर भरपूर असतात. सकाळी नारळाच्या चटणीसोबत याचं सेवन करणं तुम्हाला नक्कीच आवडेल. यात फायबर भरपूर असल्याने तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळेल.

तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये मूग आणि दलियाचा चिल्याचंही सेवन करू शकता. याची टेस्टही चांगली असते आणि यात कॅलरी सुद्धा कमी असतात. तसेच यात फायबरही भरपूर असतात. कॅलरी कमी असल्याने याच्या सेवनाने तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळेल.

तसेच तुम्ही फर्मेंटेंड तांदूळ आणि डाळीच्या बॅटरने तयार डोसाही खाऊ शकता. यातही कॅलरी कमी असतात. टेस्ट वाढवण्यासाठी याच्यासोबत तुम्ही खोबरं, टोमॅटो आणि पुदीन्याची चटणी बनवू शकता.