Bharat biotechs covid vaccine covaxin could be launched as early as february Report
पॉझिटिव्ह बातमी! मेड इन इंडिया 'कोवॅक्सिन' येत्या फेब्रुवारीमध्ये लॉन्च होणार?, तज्ज्ञांचा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 06:24 PM2020-11-05T18:24:19+5:302020-11-05T18:35:14+5:30Join usJoin usNext गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून कोरोना व्हायरसने कहर केला आहे. अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसची लस कधी येणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. वरिष्ठ सरकारी वैज्ञानिकांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, भारत सरकारअंतर्गत कोविड -19 ची लस फेब्रुवारीच्या सुरूवातीस किंवा त्याआधीच लॉन्च केली जाऊ शकते. शेवटच्या टप्प्यातील चाचण्या या महिन्यात सुरू झाल्या आहेत आणि आतापर्यंतच्या अभ्यासानुसार ही लस सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. आयसीएमआरसह कोवॅक्सिन विकसित करणार्या भारत बायोटेक या कंपनीला यापूर्वी पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ही लस लॉन्च करता येईल अशी आशा होती. लसीमध्ये चांगली कार्यक्षमता दिसून आली आहे. अशी अपेक्षा आहे की पुढील वर्षाच्या सुरूवातीस, फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये काहीतरी उपलब्ध होईल. अशी प्रतिक्रिया जागतिक आरोग्य संघटनेच्या टास्क फोर्सच्या सदस्य आणि आयसीएमआर वैज्ञानिक रजनी कांत यांनी दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात लॉन्च केल्यास कोव्हॅक्सिन ही भारत-निर्मित प्रथम लस ठरेल. आयसीएमआरचे संशोधन व्यवस्थापन, धोरण, नियोजन आणि समन्वय कक्षाचे प्रमुख असलेले कांत म्हणाले की, ''तिसर्या टप्प्यातील चाचण्या संपण्यापूर्वीच लोकांना कोवॅक्सिन देता येईल की नाही हे आरोग्य मंत्रालयाद्वारे ठरवले जाईल. पहिल्या दोन टप्प्यातील चाचण्यांमध्ये आणि प्राण्यांच्या अभ्यासामध्ये लसीने सुरक्षितता आणि कार्यक्षमता दर्शविली आहे म्हणून लस सुरक्षित ठरत असली तरी परंतु तिसरी चाचणी संपल्याशिवाय आपण 100% खात्री बाळगू शकत नाही. '' पुढे त्यांनी सांगितले की, ''धोका घ्यायला तयार असाल तर तुम्ही ही लस घेऊ शकता. आवश्यक असल्यास सरकार आपत्कालीन परिस्थितीत ही लस देण्याचा विचार करू शकते.'' "आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सप्टेंबरमध्ये सांगितले होते की सरकार कोविड -19 लसीसाठी विशेषत: वृद्ध आणि उच्च जोखीम असलेल्या ठिकाणी काम करत असलेल्या लोकांना लस देण्यासाठी प्राधान्य देणार आहे. "आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सप्टेंबरमध्ये सांगितले होते की सरकार कोविड -19 लसीसाठी विशेषत: वृद्ध आणि उच्च जोखीम असलेल्या ठिकाणी काम करत असलेल्या लोकांना लस देण्यासाठी प्राधान्य देणार आहे. Read in Englishटॅग्स :आरोग्यकोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्याHealthcorona virusCoronaVirus Positive News