Bird flu panic in india know symptoms and prevention tips to avoid
४ राज्यात बर्ड फ्लूचा कहर; चिकन आणि अंडी खाणं कितपत सुरक्षित? जाणून घ्या फॅक्ट्स By manali.bagul | Published: January 7, 2021 01:30 PM2021-01-07T13:30:42+5:302021-01-07T13:54:31+5:30Join usJoin usNext Bird flu symptoms and prevention बर्ड फ्लूच्या संकट भारतातील अनेक राज्यात पसरलं आहे. हिमाचल प्रदेशात आतापर्यंत हजारोंच्या संख्येने पक्षी बर्ड फ्लूच्या कचाट्यात सापडले आहेत. राजस्थान, मध्यप्रदेशात कावळे आणि केरळमध्ये बदकांसाठी हा आजारा जीवघेणा ठरत आहे. गेल्या काही दिवसात हरियाणातही बर्ड फ्लूनं कहर केला आहे. यामुळे पोल्ट्रीमधील एक लाख पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशातील पोंग डॅम झील परिसरात जवळपास १८०० पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचं दिसून आलं आहे. राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये जवळपास २५० कोवळ्यांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. बर्ड फ्लू हा एक अतिशय धोकादायक रोग आहे जो इन्फ्लूएंझा टाइप-ए विषाणूमुळे पसरतो. त्याला एव्हीयन इन्फ्लूएन्झा देखील म्हणतात. बर्ड फ्लू पक्ष्यांपासून मनुष्यांत किंवा इतर प्राण्यांमध्येही पसरू शकतो. हे प्रामुख्याने पोल्ट्री फार्ममध्ये वाढत असलेल्या कोंबड्यांपासून पसरण्यास सुरूवात होते. कोरोना प्रमाणेच यातही बर्याच प्रकारचे स्ट्रेन असतात. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, जिवंत किंवा मृत संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात येण्यामुळे हा आजार होऊ शकतो. पण ते एका व्यक्तीकडून इतर व्यक्तीपर्यंत सहज पसरत नाही. शिजवलेल्या पोल्ट्री फूडमुळे कोणत्याही व्यक्तीस बर्ड फ्लू होऊ शकतो याचा पुरावाही नाही. हा विषाणू उष्णतेस संवेदनशील आहे आणि तापमानात नष्ट होतो. बर्ड फ्लूचे बरेच प्रकार असूनही, एच 5 एन 1 हा पहिला एव्हीयन इन्फ्लूएन्झा आहे, ज्याने मनुष्यास प्रथमच संक्रमित केले. त्याची पहिली घटना 1997 मध्ये हाँगकाँगमध्ये उघडकीस आली. एच 5 एन 1 सामान्यत: पाण्यामध्ये राहत असलेल्या पक्ष्यांमध्ये होतो. परंतु पोल्ट्री फार्ममध्ये वाढणार्या पक्ष्यांमध्ये तो सहजतेने पसरू शकतो. पोल्ट्री फार्मचे पक्षी संक्रमित झाल्यानंतर, मनुष्यांमध्ये ते पसरण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. पक्ष्यांची विष्ठा, लाळ, नाक-तोंड किंवा डोळे यांच्या स्रावांद्वारे बर्ड फ्लू रोग मानवांमध्ये पसरतो. हेल्थलाईनच्या अहवालानुसार संपूर्ण शिजलेले मांस किंवा पक्ष्यांचे अंडे खाल्ल्याने हा आजार लोकांमध्ये पसरत नाही. एच 5 एन 1 संक्रमित पक्षी सुमारे 10 दिवसांपर्यंत मळ किंवा लाळ द्वारे व्हायरस पसरवू शकतो. दूषित पृष्ठभागावरुन आपण व्हायरसचा धोका वाढवून घेऊ शकता. हे टाळण्यासाठी पोल्ट्री फार्ममध्ये काम करत असलेल्या लोकांपासून दूर रहावे. याशिवाय अर्धवट शिजलेले किंवा कच्चे मांस आणि अंडी खाणेही बर्ड फ्लूचा बळी ठरू शकते. तसेच संक्रमित रूग्णांची तपासणी किंवा काळजी घेत असलेल्या आरोग्य सेवेकडे जाण्याचे टाळा. घरातल्या कोणत्याही संक्रमित व्यक्तीपासूनदेखील एक विशिष्ट अंतर ठेवलं पाहिजे. ओपन एअर मार्केटमध्ये जाणं टाळा आणि स्वच्छता-हँडवॉश यासारख्या गोष्टींची विशेष काळजी घ्या. बर्ड फ्लूची लक्षणे सामान्यत: उद्भवणार्या फ्लूसारखीच असतात. एच 5 एन 1 संसर्गाची शक्यता असल्यास आपणास खोकला, अतिसार, श्वसन समस्या, ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, अस्वस्थता, वाहणारे नाक किंवा घश्याचा त्रास जाणवू शकतो.टॅग्स :बर्ड फ्लूहेल्थ टिप्सआरोग्यBird FluHealth TipsHealth