तुम्हाला सतत ओठ चावण्याची सवय आहे का? ठरु शकते अत्यंत घातक, निमंत्रण द्याल 'या' गंभीर आजारांना By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 06:22 PM 2021-08-24T18:22:12+5:30 2021-08-24T19:05:07+5:30
तुम्हाला तुमचे ओठ चावण्याची सवय आहे का? असल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ही वाटते तितकी सामान्य समस्या नाही. हे अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. ओठ चावणे हे कोणकोणत्या गंभीर आजारांचे लक्षण आहे हे जाणून घेऊया... काही वेळा ओठ चावणे ही सामान्य सवय वाटू शकते. पण हे दिसते तितके सहज नाही. ही सवय अनेक गंभीर आजारांचं कारण असू शकते. ओठ चावण्याची कृती तोंडाशी निगडित आजारांशी निगडित असू शकते असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
अमेरिकन ब्रँड कोलगेटवर तज्ज्ञांनी ओठ चावण्यामागची कारणं सांगितली. त्यांनी सांगितलं की लोकं ओठ चावण्याच्या सवयीचे शिकार का असतात? यामागे मुख्यत: पाच कारणे असतात.
हे Temporomandibular joint या डिसऑर्डरचे सामान्य कारण आहे. याची लक्षणं सामान्य ते गंभीर असू शकतात. ती अत्यंत घातक स्वरुपही धारण करू शकतात. जी रुमेटॉईड आर्थरायटीसमुळे असू शकतात.
आर्थराईटिस् च्या प्रकारानुसार तुमच्या जबड्याचा आकार बदलणे, सुज अशा समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञ सांगतात कि ओठ चावण्यासोबतच तुमच्या जबड्यात, दातात दुखणे अथवा डोकेदुखी असेल तर हे जबड्यातील आर्थाराईटिसची लक्षणे असू शकतात.
दात चावल्यामुळे TMJची समस्या वाढू शकते. दात चावण्यामागे स्ट्रेस हे देखील कारण असू शकते. हे तुम्ही झोपल्यावर जास्तवेळा होण्याची शक्यता असते.
जेव्हा कोणत्याही व्यक्तीचे दात वेडेवाकडे असतात तेव्हा ओठ चावण्याची समस्या निर्माण होते. हा कोणताही गंभीर आजार नसला तरीही जर यामुळे दात अथवा ओठ दुखण्याची समस्या उद्भवल्यास डॉक्टरचा सल्ला घेणे योग्य.
डिप्रेशन असल्यासही ओठ किंवा दात चावण्याची समस्या उद्भवू शकते. बॉडीचे रिपिटेटीव्ह बिहेवियर मानसिक रोगाचा एक भाग असतो ज्यात दात अथवा ओठ चावणे समाविष्ट आहे.
तज्ज्ञांच्या मते ओठ चावणे ही फार मोठी समस्या नाही परंतु यात ओठ चावल्याने ओठांची जळजळ तसेच त्वचा निघणे अशा समस्या उद्भवू शकतात. तसेच ही एक वाईट सवय आहे.
तज्ज्ञांच्या मते जर तुमची मुलं अथवा तुम्ही ओठ चावण्याच्या समस्येनं त्रस्त असाल तर तुम्ही त्वरित दातांच्या डॉक्टरला दाखवून घ्या. तेच या समस्येचा योग्य इलाज करु शकतात.
जर तुम्हाला TMJ हा आजार झाला तर डॉक्टर तुम्हाला डाऐट प्लान ते सॉफ्ट फुड खाण्यासारख्या घरगुती उपचारापर्यंत सल्ला देऊ शकतात. तसेच सुज आली असल्यास औषधेही देऊ शकतात.