Health tips: हे कडवट पदार्थ पाहताच तुमचं तोंड कडू होत असेल पण फायदे वाचाल तर रोजच खाल By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 05:22 PM 2022-07-13T17:22:39+5:30 2022-07-13T17:36:28+5:30
कडू चवीचे पदार्थ शक्यतो कोणालाही आवडत नाही. कडुपणामुळे तोंड कडू पडते. यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाच त्याची चव चाखायची नसते. मग ते कडू कार्ले असो किंवा ग्रीन टी. पण तुम्हाला माहिती आहे का? चवीला कडू असलेले हे पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या फायद्यांबद्दल माहिती देणार आहोत. | क्रूसिफेरस हे खरं तर भाज्यांचे एक कुटुंब आहे. ज्यामध्ये ब्रोकोली, मुळा आणि कोबी यासारख्या भाज्यांचा समावेश होतो. त्यांची चव काहीशी कडू असली तरी ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. त्यात असलेल्या ग्लुकोसिनोलेट्समुळे त्यांना कडू चव असते.
डार्क चॉकलेटची चव सामान्य चॉकलेटच्या तुलनेत काहीशी कडू असते. कारण त्यात कोको पावडर वापरली जाते. जेव्हा कोको कच्चा असतो तेव्हा त्याची चव कडू असते. यामध्ये पॉलीफेनॉल आणि अँटी-ऑक्सिडंट असतात. जे रक्तवाहिन्यांसाठी फायदेशीर असतात तसेच शरीरातील सूज कमी करतात.
कडू कारल्याची चव कोणालाच आवडत नाही. असे असूनही या भाजीमध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात. जे आपल्या आरोग्यासाठी चांगले सिद्ध होतात. कारल्यामध्ये फायटोकेमिकल्स, पॉलिफेनॉल्स, फ्लेव्होनॉइड्स असतात. जे शरीरातील साखर नियंत्रित करतात आणि त्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात.
कडू चवीने समृद्ध, ग्रीन टीची चव देखील वर नमूद केलेल्या गोष्टींप्रमाणेच कडू असते. हे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. कारले वजन कमी करण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते.
लिंबू आणि संत्री व्हिटॅमिन सी च्या गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. तुम्हाला माहीत आहे का? त्यांची सालं आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. त्यांच्या सालीमध्ये असणारा कडूपणा फळांचे कीटकांपासून संरक्षण करतो. जर तुम्ही सोललेली साल अन्नपदार्थांमध्ये वापरत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरेल.
मेथीचे दाणे सहज कच्चे खाणे सर्वांसाठी सोपी गोष्ट नाही. कारण त्याची चव खुपच कडू असते. पण हीच कडू मेथीमध्ये Minerals,Fiber,Vitamins असतात. आयुर्वेदात रक्तातील साखरेची पातळी याच्यामुळे सुधारवते . याशिवाय मेथीचे दाणे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करतात.
ग्रीन टी सोबत Apple सायडर व्हिनेगरही सध्या पॉप्युलर ड्रिंक झाली आहे. या मध्ये antimicrobial आणि Anti-oxidant आहेत जे वजन कमी करायला मदत करतेच पण त्या सोबत Cholestrol पण कमी करते, Blood Sugar कमी करते आणि Bacteria ला पण मारण्यात मदत करते. पण 1 ते 2 चम्मच हुन जास्त Apple सायडर व्हिनेगर घेणं टाळलं पाहिजे. (टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमीच एखाद्या विशेषज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
बर्याच कडू पदार्थांप्रमाणेच कॉफीमध्येही पॉलिफेनॉल्स असतात. हा Anti-oxide चा एक प्रकार आहे जो शरीरात ऑक्सिडेटिव्ह डॅमेजला रोखतो.हृदयरोग आणि Diabities सारख्या आजारांचा धोका कमी करतो. बर्याच संशोधनामधून असे ही समोर आले आहे की दररोज 1 कप कॉफी पिल्याने Diabities, Cancer आणि Heart Attack चा धोका कमी होतो. कॉफी फायदेशीर आहे, याचा अर्थ असा नाही की आपण दिवसभर कॉफी प्यायला हवी. मर्यादित प्रमाणात घेतल्यानेच कोणत्याही गोष्टीचा फायदा होतो. कॉफीची कडू चव फायदेशीर असते. त्यामुळे त्यात दूध, साखर किंवा मलई मिसळून त्याची चव बदलू नका.
टोमॅटो केवळ एक रसाळ आणि चवदार भाजी नाही, तर स्मरणशक्ती वाढविण्यासाठीच्या देखील खूप महत्त्वाचा घटक आहे. फोर्ब्सच्या संशोधनानुसार टोमॅटोमध्ये लाइकोपीनचे प्रमाण जास्त असते, जे आपल्या शरीरात अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करते. टोमॅटो आपल्या पेशींना दुषित होण्यापासून वाचवतो. तसेच आपली स्मरणशक्ती वाढविण्यासही मदत करतो. टोमॅटो जवळजवळ सर्व भाज्या बनवताना वापरला जातो. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही तो कच्चा देखील खाऊ शकता.
हिरव्या भाज्या आपली स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करतात, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. पालकात भरपूर प्रमाणात फोलेट, व्हिटॅमिन के, ई असते. हे घटक आपल्या मेंदूला चालना देण्याचे काम करतात. या व्यतिरिक्त आपण आपल्या आहारात कोबी, कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा लेट्युस या हिरव्या भाज्या समाविष्ट करू शकता.