कोरोना उपचारातील 'ही; चूक ठरत आहे जीवघेणी, त्यानेच वाढतोय दिवसेंदिवस ब्लॅक फंगसचा धोका? By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 01:58 PM 2021-05-22T13:58:31+5:30 2021-05-22T14:12:14+5:30
Black Fungus : हे एक दुर्मीळ संक्रमण आहे ज्याला म्यूकोरमायकोसिस असंही म्हटलं जातं. हे कोविड १९ च्या रूग्णांना किंवा बरे झालेल्या रूग्णांसाठी घातक ठरू शकतं. कोरोनासोबतच आता ब्लॅक फंगसमुळे लोकांचं टेंशन वाढलं आहे. दररोज याचे रूग्ण आढळून येत आहेत. लोकांच्या मनात याबाबत मोठी भीती आहे. पण घाबरण्याऐवजी लोकांनी याबाबत जागरूकता ठेवावी. मुंबई एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे एमडी आणि प्रसिद्ध कार्डिओवस्कुलर थोरेसिक सर्जन रमाकांत पांडा यांनी याबाबत आजतकसोबसत बोलले. त्यांना यावेळी ब्लॅक फंगसबाबत विस्ताराने सांगितलं.
डॉक्टर पांडा म्हणाले की, ब्लॅक फंगस हा काही आजार नाही. भारतात अनेक लोक यौगिक जलनेति (पाण्याने नाकाची स्वच्छता) करतात. हे करत असताना जास्तीत जास्त लोक पाण्याच्या स्वच्छतेवर जास्त लक्ष देत नाहीत. काही वर्षांपूर्वी अस्वच्छ पाण्याने जलनेति केल्यााने ब्लॅक फंगसच्या केसेस समोर आल्या होत्या. चला जाणून घेऊ याबाबत...
हे एक दुर्मीळ संक्रमण आहे ज्याला म्यूकोरमायकोसिस असंही म्हटलं जातं. हे कोविड १९ च्या रूग्णांना किंवा बरे झालेल्या रूग्णांसाठी घातक ठरू शकतं. जर वेळीच लक्ष दिलं गेलं नाही. तर ५० ते ८० ट्क्के रूग्णांचा याने मृत्यू होतो. हे एक फंगल इन्फेक्शन आहे जे खासकरून अशा लोकांना संक्रमित करतं जे कोणत्या ना कोणत्या आजारामुळे औषधांवर आहेत. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अशात हवेच्या माध्यमातून सायनस किंवा फुप्फुसात संक्रमण पसरतं.
हे फंगस शरीराच्या कोणत्या भागात पसरलं आहे त्यावर याची लक्षणे अवलंबून असतात. सामान्यपणे हे सायनस, फुप्फुसं आणि मेंदूत पसरतं. याची सामान्य लक्षणे नाक बंद होणे, नाकाच्या आत रफनेस, नाकाची त्वचा काळी पडणे. त्यासोबत डोळे दुखणे आणि धुसर दिसणे हेही लक्षणे आहेत.
जर एखादी व्यक्ती कोरोनाने संक्रमित असेल आणि त्याला ब्लॅक फंगस होत असेल तर त्याचे फुप्फुसं अधिक खराब होतात. त्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो, छातीत दुखतं आणि फुप्फुसात पाणी भरण्याची समस्या जास्त होऊ लागते. त्यासोबतच डोकेदुखी, खोकला, रक्ताच्या उलट्या, आणि मानसिक आजाराची लक्षणेही आहेत.
हे फंगस फारच वेगाने परसतं. सामान्यपणे याची माहिती ENT तज्ज्ञ किंवा MRI च्या माध्यमातून मिळते. हे त्या लोकांनाही होऊ शकतं जे पाणी न उकळून किंवा न गाळता जलनेति करतात. डॉक्टर पांडा सांगतात की, ब्लॅंक फंगस ही समस्या आपल्यात हजारो वर्षांपासून आहे. पण गेल्या १० वर्षात याच्या मोजक्याच केसेस समोर आल्या आहेत.
अमेरिका, यूरोप आणि इतर देशांमध्येही कोरोनाच्या काही रूग्णांमध्ये ब्लॅक फंगसच्या केसेस आढळल्या आहेत. पण भारतात या केसेस अचानक वाढल्या आहेत. खासकरून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ब्लॅक फंगसने डोकं वर काढलं.
डॉक्टर पांडा म्हणाले की, या आजाराचं मुख्य कारण स्टेरॉयड चा बेसुमार वापर आणि रूग्णांना जास्त वेळ अशुद्ध ऑक्सीजन देणं आहे. ज्या लोकांचा डायबिटीस वाढला आहे, स्टेरॉयडमुळे ज्यांच्यात इम्यूनोसप्रेशन होतं, जे लोक ICU मध्ये जास्त वेळ राहतात, ट्रान्सप्लांटनंतर ज्यांना समस्या होते आणि कॅन्सर रूग्णांना याची लागण होण्याची भीती जास्त असते.
ब्लॅक फंगस आपल्या घरातच आढळतो. हा ओल्या मातीच्या म्यूकरच्या संपर्कात आल्याने तयार होतो. हे फंगस सामान्यपणे माती, प्राण्यांची विष्ठा, सडकं लाकूड, खत, सडलेली फळं आणि सडलेल्या भाज्यांमध्ये आढळतं. भारतात अनेक ठिकाणी रूग्णांपर्यंत स्वच्छता न बाळगता ऑक्सीजन पोहोचवलं जात आङे. ज्यामुळे ब्लॅक फंगस वाढत आहे. त्यासोबतच कोरोनाच्या उपचारात स्टेरॉयडचा जास्त वापर केल्यानेही याच्या केसेस वाढत आहे.
मेडिकल ऑक्सीजन आणि इंडस्ट्रिअल ऑक्सीजनमध्ये मोठं अंतर असतं. मेडिकल ऑक्सीजन पूर्णपणे शुद्ध असतं आणि याला तयार करण्यासाठी कम्प्रेशन फिल्ट्रेशन आणि प्युरिफायरची खास काळजी घेतली जाते. ज्या सिलेंडरमध्ये लिक्विड ऑक्सीजन भरलं आणि पाठवलं जातं. रूग्णांना देण्याआधी त्यांचं ह्यूमिडिफिकेशन केलं जातं. यासाठी कंटेनरमध्ये स्टेरलाइज्ड वॉटर भरलं जातं आणि प्रोटोकॉलनुसार पुन्हा पुन्हा बदललं जातं.
कंटेनरचं पाणी स्टेरलाइज्ड केलं नाही तर ब्लॅक फंगस होण्याचा धोका वाढतो. डॉक्टर पांडा म्हणाले की, कोविड १९ च्या डायबिटीस आणि विना डायबिटीस रूग्णांना जर असं ऑक्सीजन मिळालं तर विचार करा काय होऊ शकतं. हेच कारण आहे की, आमच्या पब्लिक हेल्थ सिस्टीमवर ओझं वाढलं आहे.
डॉक्टर पांडा म्हणाले की, कोविड १९ च्या उपचारात स्टेरॉयडचा वापर योग्य वेळी व्हायला हवा. स्टेरॉयड केवळ कोरोनाच्या प्रभावाशी लढतं थेट कोरोनाशी नाही. कोरोनाच्या सुरूवातीच्या दिवसातच हे रूग्णांना देणं घातक ठरू शकतं. याने व्हायरस आणखी वाढतो याने इम्यूनिटीही कमी होते. डॉक्टर म्हणाले की, डायबिटीसच्या रूग्णाला विनाकारण स्टेरॉयड दिल्यास त्यांची शुगर वाढू शकते. याने गंभीर परिणाम होऊ शकतात.
ऑक्सीजनच्या क्वॉलिटीवर लक्ष दिलं तर ब्लॅंक फंगसचा धोका कमी केला जाऊ शकतो. कंटेनरची विशेष काळजी घेतली तरच फायदा होईल. तसेच स्टेरॉयड वापर कमी करावा. रूग्णांनी घरी गेल्यावर शुगर चेक करत रहावं.