चिंताजनक! कोरोनाच्या संकटात आता फंगल इन्फेक्शनचा वाढतोय धोका; जाणून घ्या लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 11:43 AM2020-12-24T11:43:33+5:302020-12-24T12:12:40+5:30

दिल्लीपासून गुजरात आणि मुंबईमध्येही ब्लँक फंगसच्या इन्फेक्शनची प्रकरणं समोर येत आहेत. फंगलने संक्रमित झालेल्या व्यक्तीला योग्यवेळी उपचार मिळाले नाही तर डोळ्यांवरही परिणाम होऊ शकतो. दिल्लीतील सर गंगाराम रूग्णालयात ब्लँक फंगस म्हणजेच म्यूकॉरमाइकोसिस या आजाराचे सगळ्यात पहिलं प्रकरण नोंदवण्यात आलं आहे. याशिवाय दिल्लीतील मॅक्स, अपोलो आणि फोर्टीस रुग्णालयासारख्या रूग्णालयात ब्लँक फंगसचे रुग्ण यायला सुरूवात झाली आहे. यातील काही रूग्णांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या आणि बरे होणार्‍या लोकांसाठी हे इन्फेक्शन एक मोठा धोका म्हणून समोर आलं आहे, ज्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सर गंगाराम हॉस्पिटलशी संबंधित ज्येष्ठ ईएनटी विशेषज्ञ डॉ. मनीष मुंजाळ यांचा असा विश्वास आहे की हा एक गंभीर रोग आहे, परंतु याची भीती बाळगण्याची गरज नाही.

'ब्लॅक फंगस किंवा म्यूकोमायकोसिस हा नवीन रोग नाही. हे केवळ नाक, कान आणि घशालाच नव्हे तर शरीराच्या इतर भागांनाही नुकसान करते, परंतु गेल्या काही दिवसांपासून हा रोग मोठ्या प्रमाणात रूप धारण करीत आहे, कारण हा रोग रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे होतो. पूर्वी हा रोग केमोथेरपी, अनियंत्रित मधुमेह, प्रत्यारोपणाच्या रूग्ण आणि वृद्ध लोकांमध्ये दिसायचा. पण आता कोविड १९ च्या रुग्णांमध्येही हा आजार दिसून येत आहे.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार डॉ. मुंजाळ सांगतात, ''हा आजार स्पर्श करून पसरत नाही, परंतु हे फंगस हवेतच राहते. हे आपण ब्रेड आणि झाडाच्या खोडांवर फळांच्या स्वरूपात तुम्ही पाहात आसाल. ही बुरशी आपल्या नाकातून कफमध्ये जाते आणि आपल्या नाकाच्या त्वचेत जाते. यानंतर, हा रोग खूप वेगाने पसरतो आणि आणि मेंदूत जातो. यामध्ये मृत्यूचे प्रमाण 50 टक्के आहे.

,डॉ. मुंजाळ यांच्यासह इतर डॉक्टरांचा असा विश्वास आहे की या आजाराची भीती बाळगण्याची गरज नाही. स्टार इमेजिंग लॅबचे संचालक डॉ. समीर भाटी म्हणतात, 'हा नवीन रोग नाही हे समजून घ्यायला हवं. हा आजार आपल्या आधीपासूनच अस्तित्वात होता. हे देखील माहित असणे आवश्यक आहे. अनियंत्रित मधुमेह असलेल्या लोकांना धोका असतो. त्याचबरोबर प्रत्यारोपणाच्या रुग्णांना आणि आयसीयूमध्ये दाखल झालेल्यांनादेखील धोका असतो कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे.

या फंगल इन्फेक्शनचा संसर्ग असलेले बरेच लोक कोरोनाबाधीतही आहेत. दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलचे ईएनटी तज्ज्ञ डॉ. संजय सचदेवा म्हणतात, "ब्लँक फंगसचे बरेच रुग्ण आमच्याकडे येत आहेत, त्यापैकी बहुतेक आधीच मधुमेहाचे रुग्ण आहेत, काही स्टिरॉइड्स घेत आहेत, परंतु त्यातील बहुतेक कोविडपासून बरे झालेले आहेत. कोविड संक्रमित तीन रुग्ण आमच्याकडे आले आहेत, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. आमच्याकडे येणारे बहुतेक रुग्ण असे म्हणतात की, त्यांनी डोळ्यांनी नीट दिसत नाही, अस्पष्ट दिसत आहेत.

बुरशीमुळे डोळ्यातील सूज येते, ज्यामुळे एक किंवा दोन दिवसात डोळ्यांचा प्रकाश कमी होतो. बहुतेक रूग्णांची दृष्टी कमी झाली आहे.'' या बरोबरच डॉ. सचदेवा स्पष्ट करतात की जे लोक कोविडपासून बरे झाले आहेत, स्टिरॉइड्स घेतलेले आहेत आणि मधुमेह आहेत त्यांना डोळेदुखी झाल्यास वैद्यकीय मदत घ्यावी.

नाकाच्या आतील भींतींवर कोरडेपणा येतो, नाक बंद होणं, डोळ्यांना सुज येणं, डोळे लाल होणं, अशी लक्षणं दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.