Bloated gassy stomach try these ayurvedic remedies
पोट फुगणे आणि गॅसची समस्या दूर करण्याचे खास घरगुती उपाय! By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 03:17 PM2018-08-29T15:17:52+5:302018-08-29T15:31:36+5:30Join usJoin usNext पोट फुगणे ज्याला वैज्ञानिक भाषेत 'टमी ब्लोटिंग' म्हणतात. पोटात सतत गॅस आणि अॅसिड गेल्याने हळूहळू पोट फुगू लागतं. जेव्हा आपण काही चुकीचं खातो, वेळेवर खात नाही, पोटातील गॅस बाहेर येऊ देत नाही तेव्हा ब्लोटिंग म्हणजेच पोट फुगणे ही समस्या होते. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या औषधांचा आधार घेतात. तसेच ही समस्या दुर्लक्षित करण्यासारखीही नाहीये. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला यावरील काही घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायांच्या माध्यमातून तुम्हाला पोट फुगण्याच्या समस्येतून सुटका मिळेल. पोट फुगल्यासारखे वाटत असेल, दुखत असेल किंवा गॅस निघण्यासही समस्या होत असेल तर तुमच्या आहारात लसणाचा समावेश करा. हळूहळू आहारातील लसणाचं प्रमाण वाढवा. याने तुमची पचनक्रिया चांगली होते आणि आतड्यांमध्ये फसलेले बॅक्टेरिया बाहेर येतील. केळ्यामध्ये फायबर या तत्वाचं प्रमाण अधिक असतं. याने पोटातील गॅसची समस्या दूर होते आणि पोट फुगण्याची समस्याही दूर होते. पोटातील गॅस दूर करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे पुदीना. हे तुम्ही चहा करताना वापरु शकता. चहा करताना त्यात पुदिन्याची २ ते ३ पाने टाका. या चहाने तुम्हाला आराम मिळेल. १०० ग्रॅम बडीशेप लिंबाच्या रसात मिश्रित करुन एका बाटलीमध्ये ठेवा. ही बडीशेप जेवण केल्यानंतर थोडी खावी. याने पचनक्रिया सुधारते आणि पोटात जडपणाही वाटणार नाही. सोबतच गॅसची समस्याही दूर होईल. दह्यामध्ये बॅक्टेरिया असतात ज्याने आपली पचनक्रिया चांगली राहते. याने अन्न पचायला मदत मिळते. गरमीच्या दिवसात दही खाल्याने गॅसची समस्याही होत नाही, तसेच पोटही फुगत नाही. आलं हा पोटाशी निगडीत वेगवेगळ्या समस्या दूर करण्यावर रामबाण उपाय मानला जातो. याचा वापर तुम्ही चहामधून किंवा एखाद्या पदार्थामधून करु शकता. २ ते ३ दिवस हे खाल्यास पोट फुगण्याची समस्या दूर होईल. ब्लोटिंगचं मुख्य कारण गॅस तयार होणं हे आहे. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता. याने पोटात गॅस तयार होणार नाही.टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यHealth TipsHealth