Bollywood Celebrities Who Battled Alcohol And Drug Addiction
ड्रग्ससारख्या जीवघेण्या व्यसनातून बाहेर आले हे ५ सेलिब्रिटी By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 05:18 PM2018-04-03T17:18:36+5:302018-04-03T17:22:11+5:30Join usJoin usNext बॉलिवूडचे सेलिब्रिटी स्वत:चं फिटनेस व सौंदर्य जपण्यासाठी बरीच मेहनत घेत असतात. दररोज नियमितपणे व्यायाम, हेल्दी डाएट हा त्यांच्या दैनंदिन कामांचा महत्वाचा भाग असतो. पण त्यांना अशाही काही सवयी आहेत ज्यापासून दूर राहणं त्यांना अशक्य असतं. पण जीवघेण्या व्यसनांच्या आहारी गेल्यानंतर होणारा त्रास काही सेलिब्रिटींच्या जीवावर बेतला. म्हणूनच या व्यसनांपासून दूर जाऊन काही सेलिब्रिटींनी स्वत:चं नवीन आयुष्य सुरु केलं. संजय दत्त – संजय दत्तला ड्रग्स आणि सिगरेट्सचं व्यसन होतं. स्त्री व्यक्तिरेखेसोबत काम करताना अवघडल्यासारखं वाटू नये म्हणून संजयने ड्रग्स घेण्यास सुरूवात केली होती. पण तो आता यातून पूर्णपणे बाहेर आला आहे. ‘दर्जेदार काम करा, तीच तुमच्यासाठी नशा आहे’ असा तो आता इतरांना सल्लाही देतो. फरदीन खान – फरदीन खानला चित्रपटात काम करत असताना ड्रग्सचं व्यसन लागलं होतं. ड्रग्सच्या व्यसनामुळे २००१ साली फरदीन खानला मुंबई पोलिसांनी अटकही केली होती. त्यानंतर त्याने निर्विषकरणासाठी कोर्सही केला. फरदीनला आता कोणतंही व्यसन नाही आहे. मनीषा कोईराला – दर्जेदार चित्रपट करत असताना मनीषाला ड्रग्स आणि मद्याचं व्यसन लागलं होतं. अंडाशयाचा कॅन्सर झाल्यावर मनिषाने या सगळ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मनिषा आता ड्रग्स शरीरासाठी किती हानिकारक आहे, यासाठी इतरांना मार्गदर्शनही करते. राहूल महाजन – वडिल प्रमोद महाजनांच्या मत्यूनंतर राहुल चांगलाच चर्चेत आला. वडिलांचा सेक्रेटरी विवेक मोईत्रा सोबत राहुलने मद्याचं आणि कोकेनचं मिश्रण एकत्रित सेवन केलं. त्यात विवेक यांचा मत्यू झाला व राहुल थोडक्यात बचावला. यानंतर राहुलवर गुन्हाही दाखल झाला. आता राहुल ड्रग्सच्या व्यसनातून पूर्णपणे बाहेर आला आहे. प्रतिक बब्बर – चित्रपटसृष्टीत सुरूवात करण्याआधीच प्रतिक व्यसनांच्या आधीन गेला. मद्य आणि ड्रग्सचं सेवन अतिप्रमाणात केल्याने त्याला त्रासाला सामारं जावं लागलं. प्रतिकने व्यसनांशी सामना केला व आता तो पूर्णपणे निर्व्यसनी आहे व इतरांनाही अशा व्यसनांपासून दूर जाण्याचा सल्ला देत आहे. टॅग्स :आरोग्यकरमणूकअमली पदार्थHealthentertainmentDrugs