Britain new coronavirus strain canada bans flights ban fear grows in india
चिंता वाढली! ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या रूपाचा कहर; आंतरराष्ट्रीय उड्डाणं रोखली, भारतावरही दबाव By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 01:09 PM2020-12-21T13:09:11+5:302020-12-21T14:34:42+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरसबाबत लोकांच्या मनातील भीती कमी होताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या नव्या रूपानं कहर केला आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन VUI-202012/01 दिसून आला आहे. हा नवीन स्ट्रेन भयंकर संक्रामक असल्याचे सांगितले जात आहे. अनेक देशात परदेशातील उड्डानांवर बंदी घालण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये व्हायरसच्या नवीन स्ट्रेनमुळे चिंताजनक वातावरण पसरलं आहे. ब्रिटनमध्ये फ्रांस, जर्मनी, इटली, नेदरलँड, ऑस्ट्रिया, आयलँड आणि बुल्गेरिया या प्रदेशांतील विमानांच्या उड्डानांवर बंदी घालण्यात आली आहे. सौदी अरेबियानेही कोरोनाच्या नवीन स्ट्रेनच्या भीतीमुळे सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे एका आठवड्यासाठी रद्द केली आहेत. कोरोनाच्या नव्या रूपाची पूर्ण माहिती मिळेपर्यंत उड्डाण बंदी वाढविण्यात येऊ शकते असे सौदी अरेबियाच्या गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. सौदी अरेबियाचे समुद्री बंदरंसुद्धा एक आठवडा बंद राहतील. सरकारने आदेश दिले आहेत की गेल्या तीन महिन्यांत जर कोणी युरोपियन देशात गेले असेल तर कोविड चाचणी त्वरित करा. भारतात ब्रिटनच्या विमान उड्डानांवर सध्या कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नवीन स्ट्रेनला भारतात येण्यापासून रोखण्यासाठी तात्काळ पाऊलं उचलली जावी अशी मागणी केली जात आहे. काँग्रेसने केलेल्या मागणीनुसार ब्रिटनची सगळी उड्डानं रद्द केली जावी. आरोग्य कर्मचारी वर्गाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या नवीन रूपाचा प्रसार ब्रिटनमध्ये झपाट्याने होत आहे. व्हायरसच्या नवीन स्ट्रेनवर चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावण्यात आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत युकेमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांच्या उड्डांवर विचार केला जाणार आहे. व्हायरसचे नवीन रूप नियंत्रणात येत नसल्याचे दिसते आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी रविवारी असा इशारा दिला की, ख्रिसमसच्या काळात खरेदी करणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आवश्यक आहे कारण कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन फारच वेगाने पसरत आहे. ब्रिटिश पंतप्रधान म्हणाले की कोरोनाचा नवीन स्ट्रेन हा पूर्वीपेक्षा ७० ते ८० टक्के अधिक संसर्गजन्य असू शकतो. तथापि, अद्याप व्हायरसचे हे नवीन रूप लोकांना गंभीररित्या आजारी बनवते याचा पुरावा मिळालेला नाही. तज्ज्ञ म्हणतात की, व्हायरसबद्दल सर्व गोष्टी स्पष्ट होईपर्यंत सावधगिरी बाळगणे योग्य आहे. बर्याच देशांमध्ये, कोरोना संसर्गाच्या घटना अचानक वाढत आहे आणि त्यांना लॉकडाउन करण्यास भाग पाडले जात आहे. थायलंडमध्ये कोरोनाचा संसर्ग अचानक वाढला आहे. यापैकी बहुतेक संक्रमणाच्या केसेस थायलंडच्या सर्वात मोठ्या सीफूड बाजाराशी संबंधित आहेत.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याहेल्थ टिप्सआरोग्यcorona virusHealth TipsHealth