Cancer Symptoms : काय आहेत कॅन्सरचे मुख्य वॉर्निंग साइन? शरीरात दिसतील हे ५ बदल तर वेळीच व्हा सावध! By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 11:25 AM 2022-02-16T11:25:33+5:30 2022-02-16T11:53:36+5:30
Cancer Symptoms : कॅन्सरपासून वाचण्याची सर्वात चांगली पद्धत म्हणजे वॉर्निंग साइनच्या (Cancer Symptoms) माध्यमातून या आजाराची ओळख पटवा. जेणेकरून हा आजार थर्ड स्टेजवर जाण्यापासून रोखला जाईल. कॅन्सर (Cancer) एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. ज्याला सुरूवातीलाच रोखणं सहज असतं. पण वेळेवर लक्ष दिलं गेलं नाही तर कॅन्सर थर्ड स्टेजवर पोहोचतो. मग यातून रूग्णाचा जीव वाचवणं अवघड होऊन जातं. यापासून वाचण्याची सर्वात चांगली पद्धत म्हणजे वॉर्निंग साइनच्या (Cancer Symptoms) माध्यमातून या आजाराची ओळख पटवा. जेणेकरून हा आजार थर्ड स्टेजवर जाण्यापासून रोखला जाईल.
कशी पटवाल कॅन्सरची ओळख? - शरीरात कॅन्सरची लक्षणं किंवा वॉर्निंग साइन दिसले तर जराही उशीर न घालवता डॉक्टरांना संपर्क करावा. आज आम्ही तुम्हाला या आजाराच्या काही महत्वाच्या लक्षणांबाबत सांगणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून या तुम्ही लवकर अलर्ट व्हाल आणि हा जीवघेणा आजार अधिक वाढण्यापासून रोखू शकाल.
१) विष्ठेतून रक्त - अल्सर, इन्फेक्शन, पाइल्स असेल तर विष्ठेतून रक्त येतं. पण कॅन्सर असल्यावरही विष्ठेतून रक्त येतं. ही समस्या कॅन्सरची एक मोठी वॉर्निंग साइन आहे. गॅस्ट्रो-इंटस्टायनल ट्रॅक्टमध्ये समस्या असल्याने विष्ठेतून रक्त येतं. विष्ठेतून येणारं रक्त जास्त असेल तर रेक्टम म्हणजे मलाशय किंवा इन्टस्टाइनची समस्या असू शकते. रक्ताचा डार्क रंग पोटाच्या अल्सरकडे इशारा करतो. पण तरीही दोन्हींची टेस्ट करून घेणं गरजेचं असतं.
२) भूक न लागणे - कॅन्सरने तुमच्या मेटाबॉलिज्मवर प्रभाव पडतो. ज्याने भूक लागत नाही. पोट, पॅंक्रियाज, मोठी आतडी किंवा ओवेरिअन कॅन्सर झाल्याने पोटावर दबाव निर्माण होतो. ज्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही. कॅन्सर झाल्यावर महिला आणि पुरूष दोघांमध्ये हे लक्षण दिसतं. डिप्रेशन किंवा फ्लूमध्येही व्यक्तीची भूक कमी होते. पण दुर्लक्ष करून चालणार नाही. वेळीच डॉक्टरांशी संपर्क करा.
३) लघवीतून रक्त येणे - जर तुमच्या लघवीतून रक्त येत असेल तर हे कॅन्सरचं एक मोठं लक्षण मानलं जातं. जे किडनी आणि ब्लॅडर कॅन्सरचं लक्षण असू शकतं. पण किडनी स्टोन किंवा किडनीसंबंधी आजारही असू शकतो. अशात डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार घेऊ शकता.
४) खोकला - बऱ्याच दिवसांपासून असणारा खोकलाही कॅन्सरची वॉर्निंग साइन असू शकतो. उपचार केल्यानंतरही तुमचा खोकला बंद होत नसेल तर वेळीच फुप्फुसांचं चेकअप करून घ्या. फुप्फुसाचा कॅन्सर झाल्याने छातीत वेदना होतात, वजन कमी होतं, घसा खराब होतो, थकवा येतो आणि श्वास घेण्यास त्रास होतो. कोल्ड-फ्लू मध्येही अशी लक्षण दिसतात. पण तरीही डॉक्टरांना एकदा दाखवा.
५) घशात गाठ - तोंडात, घशात, थायरॉइड आणि व्हाईस बॉक्समध्ये गाठ असणं हेही कॅन्सरचं लक्षण असू शकतं. तसं हे इन्फेक्शनमुळेही होतं. कॅन्सरची गाठ असेल तर वेदना होतात. ही गाठ कधी कमी होत नाही आणि वाढत जाते. जर तुम्हालाही अशी काही समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा आणि योग्य ते उपचार घ्या.