का लागते वारंवार भूक? कदाचित 'या' गंभीर आजारांची लक्षणं तर नाहीत ना? जाणून घ्या कारणे By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 12:38 PM 2021-08-30T12:38:38+5:30 2021-08-30T13:11:34+5:30
आवडता नाश्ता केल्यावरही अर्धा तासाने तुम्हाला पुन्हा भूक लागते म्हणून तुम्ही एखादे चिप्सचे पाकीट उघडता.हे चिप्स खाल्यावर पुन्हा थोड्यावेळाने भूक लागली की तुम्ही फ्रिजमधला केक खाता.दिवसभर असे सतत काहीतरी खाऊन देखील तुम्हाला परत परत भूक लागतच राहते.सहाजिकच अती खाण्यामुळे तुम्हाला वजन वाढण्याची भिती वाढू लागते.तुम्हाला असा अनूभव जर सतत येत असेल तर ही एक गंभीर बाब आहे. प्रोटीन हे शरीरासाठी सर्वात महत्वाचे इंधन आहे. परंतु जर आपल्या शरीरात प्रोटीनची कमतरता झाली असेल तर आपल्याला भूक जास्त प्रमाणात लागते आणि जंक फूड खाण्याची जास्त इच्छा होते. यामुळे वजन वाढणे, लठ्ठपणा आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.
झोप पुरेशी न झाल्यामुळं शरीरातलं ग्रेलिन नावाच्या हार्मोनचं प्रमाण वाढतं त्यामुळं तुम्हाला भूक लागली आहे असं वाटत राहतं. तर लेप्टिन नावाच्या हार्मोनचं प्रमाण कमी होतं
स्निग्ध पदार्थामुळे पचनक्रियेस उशीर लागून भूक लवकर लागत नाही, म्हणजे शरीराला आवश्यक त्या घटकांचा पुरवठा होतो. त्यामुळे आहारात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण कमी झाल्यास भूक लागते.
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास पोट रिकामी राहते आणि भूक अधिक लागते. डिहाइड्रेशनच्या स्थितीत व्यक्तीला पाणी प्यायल्यानंतर लगेच पुन्हा तहान लागते. या स्थितीपासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर तुम्ही साधं पाणी पिण्याऐवजी लिंबूपाणी, जलजीरा किंवा इलेक्ट्रोल सारखी एनर्जी देणारी पेय प्यावीत. यामुळे शरीराला लगेच आराम मिळतो.
फायबरचे प्रमाण कमी असलेल्या किंवा काहीच नसलेल्या पदार्थांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण चटकन वाढते आणि तुम्हाला भूक लागते. त्यामुळे तुम्ही अधिक खाता.
आपण जाणूनबुजून आपल्या आहारावर दुर्लक्ष करत असतो, पण अशी बरीच कारण आहेत ज्यामुळे आपण आपला आहार योग्य वेळेवर घेऊ शकत नाहीत, कोणाला आपल्या कामामुळे योग्य वेळेवर आहार घेता येत नाही तर कोणाला आपल्या पोटाच्या समस्येमुळे आहार घेता येत नाही. भोजन हे आपल्या साठी सर्वात महत्वाचे आहे.
कधाकधी अधिक चिंता व तणावामुळे तुम्हाला ही खुप भूक लागू शकते.जेव्हा आपण ताणात असतो त्यावेळी आपला मेंदूमध्ये कॉर्टिकोट्रॉपिन-रिलीज(corticotropin-releasing )हॉर्मोन्स व अड्रेनालाइन याची निर्मिती होत असते. ज्यामुळे भूक लागण्याचे प्रमाणात वाढ होते.हा ताण कायम राहील्यास अड्रेनल ग्रंथी कॉर्टिसोल हे हॉर्मोन बाहेर टाकते ज्यामुळे भूकेचे प्रमाण वाढते.
जंत झाले असल्यास भूक जास्त प्रमाणात लागू शकते.कारण टेपवर्म हे जंत दिर्घ काळ पोटात राहतात. तुमच्या शरीरातील आवश्यक पोषक मुल्यांवर जगतात.यामुळे तुमच्या शरीराला फक्त साखर व फॅट्स मिळतात व सहाजिकच अपुऱ्या पोषणामुळे तुम्हाला वारंवार भूक लागते.
काही औषधांमुळे देखील भूक लागण्याची समस्या वाढू लागते.कॉर्टिकोस्टेरॉईड, साइप्रोहेप्टीडीन, ट्रायसिलीक अँटीडिप्रेसंट मुळे देखील भूक लागण्याचे प्रमाण वाढते
हायपरथायरॉईडीझममध्ये देखील भूक अधिक लागण्याची शक्यता असते.थायरॉईड मुळे शरीरातील मेटाबॉलिक रेट वाढतो.त्यामुळे ओव्हर अॅक्टीव्ह थायरॉईडमध्ये हायपरअॅक्टीव्हीटी,निद्रानाश किंवा सतत भूक लागण्याची शक्यता असते.