'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात, हार्ट अटॅकने जाऊ शकतो जीव!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 01:27 PM2024-08-14T13:27:57+5:302024-08-14T14:29:08+5:30

Heart Attack Early Sign : आज हार्ट येणार असल्याचे काही संकेत सांगणार आहोत. जेणेकरून संकेत ओळखून वेळीच योग्य ते उपचार घेऊ शकाल.

Heart Attack Early Sign : जगभरात हार्ट अटॅकमुळे सगळ्यात जास्त लोकांचा जीव जातो. वेगवेगळ्या कारणांनी लोक हृदयरोगांचे शिकार होत आहेत. इतकंच नाही तर आजकाल कमी वयातही लोकांना हार्ट अटॅक येऊ लागला आहे. अशात बरेच लोक हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. पण अजूनही अनेकांना हार्ट अटॅकच्या संकेतांबाबत फारशी माहिती नसते. आज हार्ट येणार असल्याचे काही संकेत सांगणार आहोत. जेणेकरून संकेत ओळखून वेळीच योग्य ते उपचार घेऊ शकाल.

छातीत सतत वेदना होणे हे हार्ट अटॅकचं सगळ्यात सामान्य लक्षण आहे. हार्ट अटॅक येण्याआधी छातीत जोरात वेदना होते. काही लोक याला गॅसची समस्या समजून याकडे दुर्लक्ष करतात. पण गॅसची समस्या काही वेळात दूर होते. नसा ब्लॉक झाल्यामुळे हृदयाला योग्य पद्धतीने रक्त पुरवठा होत नाही. ज्यामुळे जास्त काळ छातीत वेदना होतात. असं काही होत असेल तर वेळीच डॉक्टरांना भेटा, कारण याकडे दुर्लक्ष करणं तुमच्या जीवावर बेतू शकतं.

काही लोकांना हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवसआधी उजव्या खांद्यात आणि पायामध्ये झिणझिण्या जाणवतात. तर काही लोकांच्या टाचांवर सूज येऊ शकते. जर तुम्हाला सुद्धा अशी काही समस्या होत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.

कोणत्याही कारणाशिवाय जर तुमच्या चेहऱ्यावर सूज आली असेल तुम्ही वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण ही सूज हार्ट अटॅकचं लक्षण असू शकते. जेव्हा हृदय योग्य पद्धतीने रक्त पंप करू शकत नाही तेव्हा शरीरात जास्त प्रमाणात तरल पदार्थ जमा होतात, ज्यामुळे तोंडावर सूज येऊ शकते.

चेहऱ्याच्या डाव्या बाजूवर वेदना किंवा सुन्नता होत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण हा हार्ट अटॅकचा संकेत असू शकतो. जर जास्त दिवसांपासून तुम्हाला असं काही जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांना भेटा आणि योग्य ते उपचार घ्या.

अचानक चेहऱ्याचा रंग बदलणे हा सुद्धा हार्ट अटॅकचा संकेत असू शकतो. चेहऱ्याचा रंग निळा किंवा पिवळा होऊ शकतो. कारण जेव्हा हृदय योग्य पद्धतीने काम करत नाही तेव्हा शरीराच्या अनेक भागात योग्य प्रमाणात ऑक्सीजन पोहोचत नाही. यामुळे त्वचेचा रंग बदलू शकतो.

हार्ट अटॅक ही एक अशी समस्या जी तुम्हाला वेळ देत नाही. हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत रूग्णाचा जीवही जातो. त्यामुळे वर देण्यात आलेल्या लक्षणांपैकी कोणतंही लक्षण दिसत असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क करा. डॉक्टर वेगवेगळ्या टेस्ट करून आणि उपचार करून तुमचा जीव वाचवू शकतात.