लघवीचा रंग असा दिसणं ठरू शकतं धोकादायक, अजिबात करू नका दुर्लक्ष By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 12:14 PM 2022-07-19T12:14:27+5:30 2022-07-19T12:30:57+5:30
Clear urine color : लघवीचा रंग डार्क झाला तर समजतं की, तुम्ही डिहायड्रेटेड आहात. तेच लघवीचा रंग जेवढा हलका असेल त्याचा अर्थ होतो की, तुम्ही हायड्रेटेड आहात. उन्हाळ्यात स्वत:ला हायड्रेट ठेवणं फरा गरजेचं असतं. उन्हाळ्यात घाम जास्त येत असल्याने शरीरात पाण्याची कमतरता होते. ज्यामुळे हीट स्ट्रोक आणि उन्ह लागण्याची समस्या जास्त होते. तुम्ही हायड्रेट म्हणजे तुमच्या शरीरात योग्य प्रमाणात पाणी आहे की नाही हे जाणून घेण्याची योग्य पद्धत म्हणजे लघवीचा रंग. लघवीचा रंग डार्क झाला तर समजतं की, तुम्ही डिहायड्रेटेड आहात. तेच लघवीचा रंग जेवढा हलका असेल त्याचा अर्थ होतो की, तुम्ही हायड्रेटेड आहात.
सामान्यपणे लघवीचा रंग पूर्णपणे क्लीअर असल्यावर मानलं जातं की, तुम्ही पूर्णपणे हायड्रेटेड आहात. पण नुकतीच एका हेल्थ एक्सपर्टने याबाबत इशारा दिला आहे. त्यांचं मत आहे की, लघवीचा रंग क्लीअर असणं आरोग्यासाठी फार नुकसानकारक ठरू शकतं.
डॉ. मार्गरेट मेकार्टनी म्हणाले की, लघवीच्या रंगावरून हे स्पष्टपणे समजत नाही की, तुम्ही हायड्रेटेड आहात की नाही. टेलिग्राफशी बोलताना त्यांनी सांगितलं की, अशा हेल्थ ऑर्गनायझेशन आहेत ज्यांचं मत आहे की, लघवीचा रंग आणि हायड्रेशनमध्ये लिंक आहे. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे.
एका निरोगी व्यक्तीमध्ये लघवीचा रंग पिवळा येत असेल तर हा याचा संकेत असतो की, तुमची किडनी योग्यप्रकारे काम करत आहे. तेच जर तुमच्या लघवीचा रंग पूर्णपणे क्लीअर असेल तर याचा अर्थ हा होतो की, तुम्ही गरजेपेक्षा जास्त फ्लूइडचं सेवन करत आहात, ज्याची तुमच्या शरीराला गरज नाही.
ते पुढे म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं आणि त्या हिशेबाने पाण्याची गरजही सर्वांच्या शरीरासाठी वेगवेगळी असते. सोबतच तुमच्या शरीराला पाण्याची किती गरज आहे हे यावर अवलंबून असतं की, तुम्ही कशाप्रकारचं काम करता. डॉ. मार्गरेट मेकार्टनी यांनी सांगितलं की, लघवी पाणी आणि अनेक प्रकारच्या केमिकल्सपासून तयार होते.
पोर्ट्समाउथ विश्वविद्यालयात यूरोलॉजीमध्ये असोसिएट प्रोफेसर डॉ. जॉन एस यंग म्हणाले की, तुमच्या लघवीचा रंग यावर अवलंबून असतो की, तुम्ही फ्लूइडचं कधी आणि किती प्रमाणात सेवन करता. ते म्हणाले की, लघवीचा हलका पिवळा रंग परफेक्ट असतो. जेव्हा तुमच्या लघवीचा रंग फार जास्त डार्क असतो तेव्हा याचा अर्थ होतो की, तुम्ही योग्य प्रमाणात पाण्याचं सेवन करत नाही आहात.
डिहायड्रेशनच्या कारणाने अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. जसे की, थकवा, डोकेदुखी आणि उलटी. सामान्यपणे वृद्ध लोकांना अशाप्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. डिहायड्रेशन झाल्यावर प्रत्येक व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. एका व्यक्तीच्या शरीरातील सर्व अवयवांनी योग्यप्रकारे काम करण्यासाठी रोज 6 ते 8 ग्लास पाणी पिण्याची गरज असते. डॉ. यंग म्हणाले की, अनेकदा औषधांच्या सेवनामुळेही लघवीचा रंग डार्क होतो.
ते म्हणाले की, लघवीत इंन्फेक्शन, किडनी आणि ब्लॅडरमध्ये स्टोन, कॅन्सर आणि ब्लॅडर सिंड्रोम झाल्यावर लघवीचा रंग लाल आणि भुरका होतो. तेच लघवीचा रंग जर ऑरेंज असेल तर हा लिव्हर डिजीजकडे इशारा करतो.
काय असते क्लीअर दिसणारी लघवी - लघवीचा रंग पूर्णपणे क्लीअर म्हणजे पाण्यासारखी दिसत असेल तर याचा अर्थ हा आहे की, तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त पाणी पित आहात. लघवीचा रंग क्लीअर असणे हा किडनी डिजीजचा संकेत असू शकतो. अशात जर तुम्हाला लघवीचा रंग नेहमीच क्लीअर दिसत असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क करा.
क्लीअर लघवीचं कारण - गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने लघवीचा रंग क्लीअर येतो. त्यासोबतच अनेक प्रकारच्या आजारांमुळेही लघवीचा रंग असा येतो.
डायबिटीसमध्ये - डायबिटीस झाल्यावर व्यक्तीला लघवीचा फार जास्त समस्या होते. असं शरीरात ब्लड शुगर लेव्हल अनियंत्रित झाल्यावर होतं. डायबिटीस झाल्यावर बॉडी शुगरचं अधिक प्रमाण शरीरातून बाहेर काढण्याचं काम करतं. ज्याने व्यक्ती सामान्यपेक्षा जास्त प्रमाणात लघवी पास करतो.
जास्त पाणी पिणे - जेव्हा तुम्ही जास्त प्रमाणात पाणी पिता तेव्हा लघवीचा रंग क्लीअर दिसतो. अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. कारण यामुळे शरीरात सोडिअमची लेव्हल जास्त वाढते.