नारळ पाणी पिण्याचे हे आहेत फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 20:19 IST2018-04-11T20:19:39+5:302018-04-11T20:19:39+5:30

नारळ पाणी पिण्यासाठी सकाळची वेळ सगळ्यात उत्तम असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.
नारळ पाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. रोग प्रतिकारक शक्ती वाढते तसंच आजारांना लांब ठेवण्यास मदत होते.
वाढलेल्या वजनापासून त्रस्त असणाऱ्यांसाठी नारळ पाणी अतिशय फायद्याचं आहे.
काही लोक अंड्यातील पांढरा भाग नारळ पाण्यात मिसळून पितात त्यामुळे शरीराला प्रोटीन्स व कॅल्शिअम मिळतात.
थायरॉइड हार्मोन्सला संतुलित ठेवण्याचं काम नारळ पाणी करतं. सकाळी नारळ पाणी प्यायल्याने थायरॉइड हार्मोन्स नियंत्रित राहतात.